होळीच्या सणाला वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर सप्तरंगाची उधळण होणार आहे.. या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.. ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक मूळ वेतन 15,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कर्मचारी ‘पेन्शन योजना-1995 (EPS-95) साठी पात्र असणार आहेत. गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण होताना दिसत आहे..
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘ईपीएफओ’ (Employees’ Provident Fund Organization) ही संस्था या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा विचार करीत आहे. प्रामुख्याने 15 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नवीन पेन्शन योजनेचा लाभ होणार आहे..
नवीन पेन्शन योजना येणार
‘ईपीएफओ’च्या सदस्यांच्या पगारातील हिस्स्यावर अधिक पेन्शनची मागणी केली जात होती. त्यानुसार 15 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ पगार (Basic salary) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना आणण्याचा प्रस्ताव आणला जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ‘ईपीएफओ’च्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे..
संघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा सध्या अनिवार्यपणे ‘ईपीएस-95’मध्ये समावेश केला आहे. नोकरीवर रुजू होताना ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार (मूलभूत वेतन+महागाई भत्ता (DA)) 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांचा या योजनेत समावेश केला आहे.
‘सीबीटी’च्या बैठकीकडे लक्ष
दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ही संस्था ‘ईपीएफओ’बाबतचे सर्व निर्णय घेत असते. ‘सीबीटी’ संस्थेची 11 व 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे बैठक होत आहे. त्यात 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याज दराबाबत (Interest Rate) निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले..
या बैठकीबाबत केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की बैठकीत 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. याआधीच्या बैठकीत ‘सीबीटी’ संस्थेने 2021 या आर्थिक वर्षासाठी ‘ईपीएफ’ ठेवीवर 8.5 टक्के व्याजदर निश्चित केला होता.
होळीपूर्वी होणाऱ्या या बैठकीत कामगारांविषयी महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे..