SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: पेन्शनधारकांना दिलासा! जीवन प्रमाणपत्राबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ने आपल्या पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या बाबतीत मोठा दिलासा दिला आहे. आता EPFO च्या कर्मचारी पेन्शन स्कीम 95 (EPS 95) च्या पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) कधीही जमा करता येणार आहे.

मागील 2 वर्षांआधी ईपीएफओने लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी जे नियम केले होते त्या नियमांमध्ये बदल केला होता. निवृत्ती वेतनधारकांना त्यांचं निवृत्ती वेतन मिळत राहण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करणं आवश्यक आहे. आता केवळ नोव्हेंबरपर्यंत नाही, तर वर्षभरात कधीही लाईफ सर्टिफिकेट जमा करता येईल. एकदा जमा केल्यानंतर ते पुढील वर्षी त्याच तारखेपर्यंत म्हणजे एका वर्षापर्यंत वैध असेल.

Advertisement

जुना नियम असा होता की, यापूर्वी सरकारने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे लाईफ सर्टिफिकेट (जीवन प्रमाणपत्र) नोव्हेंबरमध्ये जमा करावं लागतं होतं. आता खुद्द सरकारनेच सांगितलं आहे की, लाईफ सर्टिफिकेट आता तुम्ही कधीही जमा करू शकणार आहेत.

ईपीएफओचं अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट:

Advertisement

ईपीएफओ (EPFO) ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, “प्रिय EPS 95 पेंशनधारक, तुमच्या लाईफ सर्टिफिकेटचा व्हॅलिडिटी पिरियड संपत आहे का? आता सदस्य कधीही लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतो जे सबमिशनच्या तारखेपासून 1 वर्षासाठी व्हॅलिड असेल.”, असं म्हटलंय. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट सादर केल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर कर्मचारी पेन्शन स्कीम 1995 द्वारे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याच्या सिस्टीमद्वारे बदलले जाऊ शकते.

लाईफ सर्टिफिकेट जमा करताना काय लक्षात घ्याल?

Advertisement

जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी तुम्हाला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर, तुमचा आधार नंबर (Aadhaar Number), तुमची बँक अकाउंट डिटेल्स (Bank Accounts Detail) अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर द्यावा लागेल. EPS 95 पेन्शनर्स आपलं लाईफ सर्टिफिकेट पेन्शन जारी करणारी बँक, कॉमन सर्विस सेंटर (CSC), पोस्ट ऑफिस, उमंग ॲप किंवा जवळच्या ईपीएफओच्या ऑफिसमध्ये जमा करू शकतात. एकदा लाईफ सर्टिफिकेट जमा केलं की, त्या तारखेपासून पुढील एक वर्षापर्यंत ते वैध असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement