SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ट्रू काॅलर’वरील तुमचे नाव, नंबर डिलिट करायचाय..? मग ‘या’ स्टेप्स फाॅलो करा..!

ट्रू काॅलर.. अज्ञात नंबरहून येणाऱ्या काॅल्सची माहिती देणारे खास काॅलर आयडी अ‍ॅप.. भारतातील मोबाईलधारक मोठ्या प्रमाणात या अ‍ॅपचा वापर करतात. ‘ट्रू कॉलर’च्या ‘डेटा बेस’मध्ये अनेक लोकांची माहिती ‘सेव्ह’ असते. त्याच्या मदतीने अज्ञात नंबरवरून येणाऱ्या कॉल्सची माहिती काही क्षणात जाणून घेता येते..

‘ट्रू काॅलर’ अ‍ॅपचा हा माेठा फायदा असला, तरी ‘ट्रू कॉलर’च्या (Truecaller) ‘डेटा बेस’वरून कोणतीही व्यक्ती तुमची माहिती मिळवू शकते. अगदी कधीही तुम्ही या अ‍ॅपचा वापर केलेला नसला, तरी तुमच्या नंबरवरील वैयक्तिक माहिती मिळवली जावू शकते. या माहितीचा चुकीच्या कामांसाठी वापर केला जाऊ शकतो. त्यातून तुम्ही नाहक एखाद्या संकटातही सापडू शकता..

Advertisement

‘ट्रू काॅलर’ अ‍ॅपवर तुम्हाला तुमची ओळख गुप्त ठेवता येते. तुम्हाला ट्रू कॉलरवरील तुमचे नाव आणि मोबाईल नंबर कायमचा हटवायचा असेल, तर तसा पर्याय उपलब्ध आहे. स्मार्टफोनमधील ‘अ‍ॅड्रेस बुक’द्वारे युजर्सचे डिटेल्स ‘ट्रू कॉलर’ तयार करतो. हा डेटा कोणीही वापरत नसले, तरी तुमचा नंबर आणि नाव ‘ट्रू कॉलर’च्या ‘डेटा बेस’मध्ये ‘सेव्ह’ झालेले असते.

तुम्ही जर हे अ‍ॅप वापरत असाल, तर तुम्ही त्यावरील तुमचा नंबर हटवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ‘अकाऊंट’ बंद करावे लागेल. मात्र, तुम्ही तुमचा नंबर डिलीट केल्यावर इतरांचे संपर्क तपशीलही जाणून घेता येणार नाहीत. अ‍ॅड्रॉईंड किंवा आयफोनवरूनही तुम्ही तुमची माहिती हटवू शकता. त्यासाठीची प्रोसेस जाणून घेऊ या..

Advertisement

अ‍ॅड्रॉईंड फोनवरुन असे करा निष्क्रिय
– सर्वप्रथम ‘ट्रू कॉलर’ अ‍ॅप ओपन करा.
– डाव्या कोपऱ्यातील ‘पीपल आयकॉन’वर क्लीक करा.
– आता सेंटिग्जमध्ये जाऊन तेथून ‘अबाऊट’मध्ये जा. इथे खाते निष्क्रीय करण्याचा पर्याय निवडा

आयफोनवर असे करा निष्क्रिय..
– ‘ट्रू कॉलर’ अ‍ॅप ओपन करा.
– उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या ‘गियर’ आयकॉनवर क्लिक करा.
– नंतर ‘अबाऊट ट्रू-कॉलर’वर जा. सगळ्यात खाली खाते निष्क्रिय करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचे खाते निष्क्रिय करा.

Advertisement

मोबाईल नंबर कसा हटवाल?
– ‘
ट्रू कॉलर’च्या ‘अनलिस्ट पेज’वर जा.
– देशाच्या संदर्भात कोड टाकून तुमचा नंबर टाका. उदा. -+911100000000
– नंतर ‘अनलिस्ट’साठी पर्याय निवडून कारण द्या.
– नंतर ‘व्हेरिफिकेशन कॅप्चा’ हा पर्याय पूर्ण करा व ‘अनलिस्ट’वर क्लिक करा.
– पुढील 24 तासांत ‘ट्रू कॉलर’कडून तुमचा नंबर डिलिट करण्यात येईल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement