SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. विविध कामे मार्गी लागतील. कामात उत्साह राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. नोकरी करणारे बॉसला खुश ठेवण्यात यशस्वी होतील. जीवनसाथी आनंदी ठेवा. शत्रू, तणाव इत्यादीपासून दूर राहा. सहकारी तुमच्या मताचा आदर करील.

वृषभ (Taurus): तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. उत्साहाच्या भरात कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. घरासाठी काम करू शकतो. ध्येयपूर्ती करण्यात यश मिळेल. पण पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. नोकरीच्या ठीकाणी पदोन्नती होईल. आज अधिकारांचा गैरवापर करू नका.

मिथुन (Gemini) : वरिष्ठांशी मतभेद होईल. मात्र वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या. अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्यावे लागेल. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करू शकता, पण ते टाळलेलेच बरे.

Advertisementकर्क (Cancer) : आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. सर्वांशी आपुलकीने वागाल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. करण्याची गरज सावधगिरी बाळगा. देईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

सिंह (Leo) : आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. कागदोपत्री पूर्तता करण्यास वेळ द्या. घरातील कामांचा आढावा घ्या. रागामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. ध्येय पूर्ण करण्यात यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या (Virgo) : आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. महत्त्वाचा निरोप येईल. त्यामुळे कामात व्यस्त राहावे लागेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. उत्पन्नात वाढ होण्याचे योग राहतील. उत्पन्नाच्या स्त्रोतातही वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल.

Advertisementतुळ (Libra) : भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील. वाहन विषयक कामे पार पडतील. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. गोंधळ टाळावा लागेल. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे हिताचे. ध्येय साध्य होतील.

वृश्‍चिक (Scorpio) : घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही. दुसऱ्यांच्यासाठी झटावे लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याचा दर्जा राखला जातो. नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील.

धनु (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकाऱ्याला मदत कराल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. हातून चांगला उपक्रम राबविला जाईल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहणे महागात पडू शकते. विद्यार्थ्यांना ध्येयपूर्तीमध्ये यश मिळू शकेल.

Advertisementमकर (Capricorn) : बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहीना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. आरोग्य आणि नोकरी इत्यादी बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मनोबल उत्तम असेल.

कुंभ (Aquarious) : आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. चांगल्या बातम्या कानावर पडतील, कामानिमित धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रात नवीआव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल.आज स्पर्धा जिंकाल. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

मीन (Pisces) : जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. लहान व्यावसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. आराम करण्याची गरज आहे. घरात आनंदी वातावरण राहील. हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल.

Advertisement