SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावी पास विद्यार्थ्यांना सरकारी अधिकारी होण्याची संधी, तब्बल 5000 पदांसाठी भरती..!

अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतात. चांगल्या गुणांनी स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी प्रत्येक जण अगदी जिवाचे रान करतो.. अशा साऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा विद्यार्थ्यांना सरकारी अधिकारी होण्याची संधी चालून आली आहे.

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ने ‘सीएचएसएल'(CHSL) परीक्षांची घोषणा केली आहे. तब्बल 5 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. विशेष म्हणजे, या परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना ‘उमंग’ मोबाइल ॲपद्वारे (UMANG mobile App) या परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे.

Advertisement

‘एसएससी, सीएचएसएल परीक्षा-2022’ ही एक राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते.. अर्ज भरताना कोणत्या शहरात परीक्षा केंद्र हवे आहे, याची माहिती देणे आवश्यक आहे.

एकूण जागा- 5000

Advertisement

कोणत्या पदांसाठी भरती..?
– लोअर डिव्हीडन क्लर्क (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
– पोस्ट असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
– डाटा एन्ट्री ऑपरेटर (DEO)

पात्रता
– या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून 12 वी पास असणे आवश्यक आहे.
– अर्जदाराचे वय 27 वर्षांपेक्षा जास्त असू नये.

Advertisement

इथे भरा अर्ज..
– कर्मचारी निवड आयोगाच्या ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
– उमंग मोबाइल ॲपद्वारेही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

असा भरा अर्ज..
– सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘न्यू यूजर’वर क्लिक करा. एसएससी, सीएचएसएल परीक्षेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
– आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा. अर्जात विचारलेली सगळी माहिती भरायची आहे.
– परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहे..
– अर्जातील सर्व माहिती तपासून शेवटी ‘सबमिशन’वर क्लिक करा.

Advertisement

परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख – 1 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022
– ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख – 8 मार्च
– ऑफलाईन बॅंकेतून परीक्षा शुल्क भरण्याची अखेरची तारीख – 10 मार्च
– आवेदन अर्जात दुरुस्त करण्याची अंतिम मुदत – 11 ते 15 मार्च
– टियर -1 कॉम्प्यूटर आधारित परीक्षेची तारीख – मे 2022
– टियर- 2 डिस्क्रिप्टीव परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement