SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..


मेष (Aries): तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भाऊ, मित्रांसोबत ग्रुप वीकेंड ट्रिपची योजना बनवायला सुरूवात करू शकतात. शेजारी, भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिक व्यक्तींना शुभ काळ आहे. शुभ घटना घडतील. आईवडील, काका,आजोबा तुमच्यावर खुश होणार आहेत.

वृषभ (Taurus): नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. कामाची पद्धत बदला, म्हणजे तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल. नवीन संधी, हाती घेतलेल्या कामात यश, प्रमोशन, असा हा काळ आहे. चर्चा सकारात्मक असेल. आत्मविश्वास वाढेल. प्रश्न पडतील.

मिथुन (Gemini) : शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. जवळच्या व्यक्तीसोबचे गैरसमज दूर करण्याची इच्छा असेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्य सिद्धी होईल. घराकडे लक्ष द्यावे लागेल. दिवसभर बाहेर राहाल

.

Advertisementकर्क (Cancer) : मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. सभोवतालच्या लोकांसाठी उत्साही वातावरण निर्माण कराल. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल. परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश देईल. नवीन संधी मिळतील. प्रवास होईल. नोकरी आपोआप मिळेल.

सिंह (Leo) : अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. पत्नीला डिनरसाठी बाहेर घेऊन जाऊ असं वाटेल. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अतिविचार करणे टाळावे. शुभ दिवस आहे. धर्माबद्दल आस्था वाढेल. शुभ कार्य घडतील. भागीदारी मध्ये सामंजस्य निर्माण करेल. कुटुंब ही तुमची प्राथमिकता राहणार. शांत राहा.

कन्या (Virgo) : शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. कामाला प्राधान्य देण्यात आणि परिणाम देण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका. करार यशस्वी होतील. संतती चिंता कमी होईल. जेवण कमी करा.

Advertisementतुळ (Libra) : आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. कुटुंब सुख, उच्च विचार व संभाषण चातुर्य यात वाढ होईल. आर्थिक लाभ, नवीन वास्तूचे स्वप्न सत्यात येईल. प्रवास योग येतील. योगा करा आणि फिट राहा.

वृश्‍चिक (Scorpio) : वायफळ बडबड करणाऱ्यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. कार्यक्षेत्रातील प्रगती सुखावह राहील. खर्च बेताने करा. घरावर कमी पण बाहेरील लोकांवर जास्त विश्वास बसेल.

धनु (Sagittarius) : क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. घरांमध्ये समारंभ होईल. प्रकृती जपा. तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल. दिवस शुभ आहे. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा. अभ्यास सुरू होऊन यश मिळेल. गुरु कृपेचा लाभ घ्या. घरात वेळ द्यावा लागेल.मकर (Capricorn) : जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. सर्व कागदपत्रे, आणि प्रवास यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरी की व्यवसाय करायचा यात शंका राहील. थोडे खर्चावर नियंत्रण ठेवावे. लाभदायक दिवस आहे. गृह सजावट, आर्थिक घडामोडी यांना प्राधान्य मिळेल. वेळीच सावध भूमिका घ्या.

कुंभ (Aquarious) : आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती ठीक राहील.

मीन (Pisces) : मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. कुटुंबीय किंवा बहिणी तुम्हाला उत्तम सल्ला देऊन फायदा करून देतील. वास्तू वाहन याकरता शुभ काल आहे. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. आज आनंदात आणखी भर पडेल. काही गफल्यात पडू नका.

Advertisement