SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

खुशखबर! 342 रुपये वर्षाला भरा आणि मिळवा 4 लाखांपर्यंत फायदा, केंद्र सरकारची खास योजना..

आरोग्य आणि जीवन या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या भूमिका बजावतात याचं मूल्य आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा कोरोनाचं संकट आलं आणि एकामागून एक जीव जाऊ लागले, त्यात कोणी सावरले जरी पण नुकसानही खूप झाले. अनेक कंपन्यांच्या विम्याबाबत सर्वसामान्यांमध्ये आज समज यामुळेच वाढली आहे. केंद्र सरकार विविध उपक्रम राबवून काही दिवसांपासून वेगाने आरोग्य विमा (Health Insurance) , जीवन विमा योजना (Life Insurance) समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अत्यंत कमी पैशात उपलब्ध करून देत आहे.

तुम्हाला विविध कंपन्यांकडून त्या सरकारी असो वा खाजगी विमा घेताना फक्त फायदे काय मिळणार याकडे लक्ष देऊनच घ्यावा. देशात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) बराच फायदा पुरवत तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देतात. यामध्ये तुम्ही जास्त पैसे देण्याची गरज नाही, कारण सर्वसामान्य लोकही या दोन्ही विमा योजना फक्त 342 रुपयांमध्ये घेऊ शकतात आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो ऑटो-डेबिट सुविधेद्वारे (तुमच्या अकाऊंट आपोआप कट होईल) देऊ शकता.

Advertisement

विमा संरक्षण 1 जून ते 31 मे पर्यंत आहे आणि त्यानंतर ते तुम्ही पुढे वाढवू शकता. यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (State Bank of India) आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करत या दोन विमा योजनांची माहिती दिलीय. एसबीआय (SBI) ने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तुमच्या गरजेनुसार विमा घ्या आणि चिंतामुक्त जीवन जगा. बचत बँक खात्यातील खातेदारांकडून ऑटो डेबिट सुविधेद्वारे प्रीमियम कापला जाईल. व्यक्ती केवळ एका बचत बँक खात्याद्वारे योजनेत सामील होण्यास पात्र असेल”, असं बँक म्हणाली. तरी आपण ऑटो डेबिट पर्याय निवडला तर आपल्या बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)

Advertisement

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) अंतर्गत अपघातात जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा विमाधारक व्यक्ती पूर्णपणे अपंग झाला असल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबास 2 लाख रुपयांची भरपाई उपलब्ध होईल. या योजनेचा असाही फायदा आहे की, जर विमाधारक अंशतः किंवा कायमचा अपंग झाला असेल तर त्याला 1 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. यामध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती हे विमा संरक्षण घेऊ शकते. या योजनेचा वार्षिक प्रीमियम देखील फक्त 12 रुपये आहे, म्हणजेच तुम्हाला वर्षाला फक्त 12 रुपये लागणार आहेत.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

Advertisement

दुसरी योजना आहे Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana जी फायद्याची तर आहेच आणि प्रीमियमही वार्षिक 300 रुपयांच्या आसपास आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं या विमा योजनेचं नाव असून याअंतर्गत, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला म्हणजेच वारसदाराला 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळतात. या योजनेचा तुम्ही 18 ते 50 वर्षे वय असल्यास लाभ घेऊ शकता. या योजनेसाठी तुम्हाला फक्त 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. दरम्यान, या दोन्ही मुदत विमा योजना आहेत. या विमा योजना एका वर्षासाठी असतात. मुदत संपल्यानंतर विमा घेण्यापूर्वी तुमच्या स्थानिक विमा एजंटला भेट द्या आणि सविस्तर माहीती घेऊन पुन्हा विमा योजना (Insurance Plans) घ्या आणि आयुष्य सुरक्षित करा.

( अधिक माहीतीसाठी तुम्ही पुढील वेबसाईटला भेट देऊ शकता ) 👉 https://financialservices.gov.in/)
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement