SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अन्यथा तुमच्याही सात-बारा उताऱ्यावर लागेल महाराष्ट्र शासनाचे नाव, ‘हे’ असू शकतं कारण..

शेतकऱ्यांनी शेतसारा भरला नसल्याने सक्तीची वसुली कारवाई होणार आहे. जे की कृषिपंप थकबाकीची ज्या प्रकारे अवस्था झाली होती, त्याप्रकारे शेतसाऱ्याची सुद्धा अवस्था झालेली आहे. तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही देखील अद्याप शेतसारा भरला नसेल तर लगेच शेतसारा भरण्याची तयारी करावी लागणार आहे.

शेतसारा वेळेत भरण्यासाठी मोहीम:

Advertisement

शेतकऱ्यांनी शेतसारा वेळेत भरावा आणि त्यांच्यावर कारवाई होऊ नये याकरिता निफाड तालुक्यात वसुलीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही शेतसाऱ्याची रक्कम अदा भरली नाही. त्यामुळे 31 मार्च पर्यंत शेतसाऱ्याची रक्कम भरली जावी म्हणून निफाड येथील तहसीलदारांनी मोहीम सुरु केली आहे.

थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाचे कर्मचारी गावोगावी फिरत आहेत. तसेच 31 मार्च पर्यंत शेतसारा भरण्याचे आवाहन करीत आहेत.

Advertisement

नियमाबद्दल जाणून घ्या..

▪️ राज्यातील शेतकऱ्यांनी समजा वेळेत रक्कम भरली नाही तर त्यांना नोटीस बजावली जाते.
▪️ नोटीस बजावल्यानंतरही जर कर दिला नाही तर सक्तीच्या वसुलीच्या कारवाईला सुरुवात होऊन तुम्हाला त्यास सामोरं जावं लागतं.
▪️ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 176 ते 182 नुसार या कारवाईला कायदेशीर आधार आहे.
▪️ पहिली नोटीस बजावल्यानंतर दुसरी नोटीस ही जंगम मालमत्ता आणि त्यानंतर स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी बजावली जाते.
▪️ यानंतरही जर खातेदाराने कर दिला नाही तर मात्र, स्थावर मालमत्ता जप्त होते म्हणजेच यानंतर लगेच खातेदाराच्या उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागते.
▪️ यानंतरही शेतकऱ्यांनी कर अदा केला नाही तर त्या मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जातो, अशी माहीती तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement