‘आयफोन’.. स्मार्टफोनमधील सर्वाधिक ‘लग्झरीयस् डिव्हाइस’.. आपल्या खिशातही ‘आयफोन’ असावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, महागड्या आयफोनचा ‘भार’ प्रत्येकाच्याच खिशाला पेलवणारा नसतो. आयफोनच्या किंमती आवाक्याबाहेर असल्याने तो खरेदीचे ‘स्वप्न’ हे स्वप्नच राहते..!
मात्र, ‘आयफोन’ खरेदीचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. कारण, हा ‘ड्रीम फोन’ तुमच्या आवाक्यात आला आहे.. सध्या ‘अमेझाॅन’ (Amazon) या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीचा सेल सुरू असून, त्यात आयफोन-12 (iPhone 12) अतिशय कमी किंमतीत तुम्हाला मिळू शकतो.. ‘बँक ऑफर’ व ‘एक्सचेंज ऑफर’मुळे अगदी स्वस्तात हा फोन तुम्हाला मिळू शकतो…
किती रुपयांत मिळणार..?
‘आयफोन-12’ चा 64 GB व्हेरिएंट 54,999 रुपये या किंमतीसह ‘लिस्टेड’ आहे, जो बाजारात 65,900 रुपयांना विकला जातो. मात्र, अमेझाॅनवर हा फोन 10,000 रुपयांच्या सवलतीत विकला जात आहे. शिवाय ‘एक्सचेंज ऑफर’चा (Exchange offer) लाभ घेतल्यास अगदी 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत तो खरेदी करता येईल.. अर्थात या ऑफरसाठी अर्ज करावा लागेल..
‘अॅपल’चे फॅन असणाऱ्यांना ‘आयफोन-12’ कमी किंमतीत खरेदी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. शिवाय रंग नि त्याच्या व्हेरिएंटनुसार ‘आयफोन’ची किंमत अजून कमी होऊ शकते. लिस्टेट किंमतीपेक्षाही (54,999 रुपये) हा फोन तुम्हाला खरेदी करता येणार आहे..
‘नो कॉस्ट ईएमआय’चा पर्याय
दरम्यान, ‘अमेझाॅन’वर ग्राहकांना हा फोन ‘नो काॅस्ट ईएमआय’ (No Cost EMI) सह खरेदी करता येईल. हा फोन 2589 रुपयांच्या ‘नो कॉस्ट ईएमआय’वर विकत घेता येईल.
तसेच ‘आयफोन-13’ (iPhone 13)वरही ‘बंपर डिस्काउंट’ दिला जात आहे.. त्याचे ‘बेस व्हेरिएंट’ 74,900 रुपये किंमतीसह ‘लिस्ट’ केलेलं आहे. शिवाय ‘आयसीआयसीआय’ बॅंकेच्या (ICICI Bank) क्रेडिट कार्डवर 6000 रुपयांची अतिरिक्त सूट ग्राहकांना मिळणार आहे..