SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्र ‘या’ महिन्यात होणार पूर्ण ‘अनलाॅक’..? ‘मास्क मुक्ती’चाही निर्णय होणार..!

कोरोनाची तिसरी लाट, त्यात ‘ओमायक्राॅन’चे संकट आल्याने ठाकरे सरकारने राज्यातील कोविड निर्बंध मोठ्या प्रमाणात कडक केले होते. त्यात नागरिकांवर अनेक बंधने घातली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. शिवाय ‘ओमायक्राॅन’ही आटोक्यात आल्याचे दिसत आहे..

कोरोनाचा कहर कमी झाल्याने राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधात (Corona restrictions) शिथिलता देण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना केल्या आहेत. मात्र, राज्य सरकारने सावध पवित्रा घेत, कोविड निर्बंध कमी करण्याबाबतच्या हालचाली सुरु केल्या आहेत. लवकरच कोरोनाच्या (Covid-19) निर्बंधातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

Advertisement

केंद्राचे राज्यांना पत्र
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या सचिवांना लिहिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारे कोरोनावरील कडक निर्बंधाबाबत पुर्नविचार करु शकतात. अनावश्यक निर्बंध दूर करुन नागरिकांना दिलासा देऊ शकतात, असे पत्रात नमूद केले आहे..

मार्चमध्ये राज्य ‘अनलाॅक’
केंद्र सरकारच्या पत्रानुसार, ठाकरे सरकार कोरोना निर्बंधाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मार्चनंतर राज्य शंभर टक्के ‘अनलॉक’ (unlock) होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्याच्या टास्क फोर्सने सावध पवित्रा घेतला आहे.. कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असली, तरी अजूनही रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत.

Advertisement

ब्रिटनमध्ये ‘डेल्टाक्रोन’सारखा नवीन व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे सगळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेणार आहे. त्यामुळे राज्यात पूर्णपणे ‘अनलॉक’ करण्यासाठी अजून थोडा वेळ घेतला जाणार आहे. मात्र, मार्चमध्ये राज्य पूर्णपणे ‘अनलाॅक’ होऊ शकते.. त्याच वेळी ‘मास्क मुक्ती’चाही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement