SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वेस्ट इंडिजविरुद्धच्या थरारक सामन्यात भारताचा विजय, शेवटच्या तीन चेंडूत हर्षल पटेलने केलं ‘असं’ काही..

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात शुक्रवारी (18 फेब्रुवारी) झालेल्या कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरील दुसऱ्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 8 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने ही टी-20 मालिका 2-0 अशी विजयी आघाडी घेत आपल्या खिशात घातली आहे.

सुरेख फटकेबाजी केली असली तरी वेस्ट इंडिजला 20 षटकांमध्ये 3 बाद 178 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 62 धावा करत उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनने सामना जिंकण्याच्या एकदम जवळ आणून ठेवला. त्याने 41 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने त्याने या धावा केल्या होत्या. त्याला साथ देत रोवमन पॉवेलनेही अर्धशतक झळकावून 36 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकार ठोकत नाबाद 68 धावा केल्या तरीही मात्र संघाचा पराभव टाळू शकला नाही.

Advertisement

भुवनेश्वर कुमारने 19वे षटक टाकले आणि मग हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात शेवटच्या 3 चेंडूमध्ये भारताने सामना आपल्याकडे फिरवला. याच षटकात त्याला पॉवेलने षटकार ठोकला होता. पण शेवटचे 2 चेंडू स्लोअर टाकत हर्षलने आणि विराट, ऋषभ व व्यंकटेश अय्यरच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून या डावात रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

तत्पूर्वी भारताने प्रथम फलंदाजी करत संपूर्ण 20 षटकांमध्ये 5 बाद 186 धावा केल्या होत्या. विराट कोहली व यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांनी भारताकडून अर्धशतकी खेळी केल्या. विराटने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 41 चेंडूंमध्ये 52 धावा करत 1 षटकार आणि 7 चौकार मारले. यासोबतच रिषभ पंतने 28 चेंडूंमध्ये नाबाद 52 धावा करून भक्कम धावसंख्या उभारण्यास साथ दिली. शेवटच्या काही षटकांत साथीला वेंकटेश अय्यरने शेवटच्या षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 33 धावांचे योगदान दिले होते.

Advertisement

या डावात वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने 25 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर शेल्डन कॉट्रेल आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी 1 विकेट्स घेतल्या.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement