SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जेव्हा सचिन तेंडुलकर रडत असतो आणि विराटचं ‘हे’ गिफ्ट घ्यायला देतो नकार..

जगातील महान क्रिकेटपटू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे सचिन तेंडुलकर होय. आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा Sachin Tendulkar ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केल्या आहेत. त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्या कोट्यावधी फॅन्सने क्रिकेटदेखील पाहण्याचं सोडून दिलं आहे, इतकी प्रसिद्धी आणि प्रेम या दिग्गजाने मिळवलंय.

तर आम्ही हे सांगायचं एक निमित्त देखील आहे की, सचिननं 2013 साली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शेवटची टेस्ट मॅच खेळली होती, त्या टेस्ट मॅचनंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) सचिन तेंडुलकरला एक खास गिफ्ट दिले होते. ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिननं ते गिफ्ट काही वेळ स्वत:जवळ ठेवलं आणि नंतर पुन्हा ते विराटला मागे दिले.

Advertisement

सचिननं एका मुलाखतीमध्ये हाच किस्सा सांगितला तेव्हा तो म्हणाला की, ‘त्यावेळी सर्वजण भावुक झाले होते. विराटनं मला एक स्पेशल गिफ्ट दिले. ते गिफ्ट म्हणजे एक पवित्र धागा होता. ती विराटच्या वडिलांची आठवण होती. सचिननं तो धागा काही वेळ स्वत:कडे ठेवला आणि नंतर परत केला. आता हा धागा मागे देण्यामागे काय कारण असेल, हा विचार विराट च्या डोक्यात आला पण नंतर त्यालाही समजलं.

नेमकं काय आहे तो किस्सा सविस्तर वाचा…

Advertisement

Advertisement

सचिन ग्रॅहम ब्रेसिंगर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला की, “मी एकटा एका कोपऱ्यात जाऊन डोक्यावर टॉवेल घेऊन बसलो होतो. मग त्यावेळी मी स्वतःचे अश्रू पुसत होतो. तो क्षण तो खूपच भावुक होता. मला त्याक्षणी पाहता विराट माझ्याकडे आला आणि त्याने मला त्याच्या वडिलांनी दिलेला एक पवित्र धागा भेट म्हणून दिला. त्याने दिलेला धागा मी काही वेळ माझ्याजवळ ठेवला. त्यानंतर तोच धागा त्याच्या वडिलांनी त्याला दिलेला असताना सचिनने तो विराटलाच परत दिला. हा धागा अनमोल धागा इतरांकडे नाही तर तुझ्याजवळच असणं गरजेचं आहे. कारण ही तुझ्याजवळ असणारी तुझ्या वडिलांची आठवण आहे. जी तू तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याकडेच ठेव, असे मी विराटला सांगितले. असे म्हणत मी विराटला ते गिफ्ट परत केले. तो खूप भावुक क्षण होता आणि हा मी कधीही विसरणार नाही.”, असं सचिन म्हणाला.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement