व्हॉट्सअॅपचा वापर जगात एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून मोठ्या प्रमाणात होतोय. युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. आता WhatsApp युजर्ससाठी एक खूशखबर आहे. बोलणं असो, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणं असो आणि स्टेटस टाकणे असो आपण अशा काही गोष्टींसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतो. आता यात आणखी फिचर वाढून व्हॉट्सअॅप अधिक रंगतदार दिसणार आहे.
जाणून घ्या नवीन खास फिचरविषयी..
व्हॉट्सअॅपवरही फेसबुकसारखा कव्हर फोटो ठेवता येणार असल्याची माहीती मिळाली आहे. व्हॉट्सअॅपवर आता बिझनेस अकाऊंट (Whatsapp Business) साठी कव्हर फोटो सेट करण्यावर आता टेस्टिंग करण्याचं काम जोमात सुरू आहे.
व्हॉट्सअॅपच्या सर्व घडामोडी ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबत काही दिवसांपूर्वीच माहिती दिली आहे. “जेव्हा हे फीचर बीटा युजर्सकरीता आणले जाईल, तेव्हा व्यवसाय प्रोफाईल सेटिंग्जमध्ये काही बदल केले जातील” असं WABetaInfo ने सांगितलंय.
WABetaInfo ने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, WhatsApp युजर्सच्या बिझनेस अकाऊंटमधील सेटिंग्जच्या आतमध्ये कॅमेरा बटण आणायचा प्लॅन आखला आहे. या फिचरद्वारे युजर्स कव्हर फोटो निवडू शकतात किंवा नवीन फोटोवर क्लिक करून कव्हर फोटो तयार करू शकतात.
समजा व्हॉट्सअॅप संपर्क यादीतील (Whatsapp Contact List) एखादा युजर तुमच्या बिझनेस प्रोफाईलला भेट देईल तेव्हा त्या यूजरला तुमच्या प्रोफाईल फोटोसोबतच तुमचा नवीन कव्हर फोटो ( दिसेल. WhatsApp बिझनेस अकाउंट्सवर कव्हर फोटो (Whatsapp Business Cover photo) सेट करण्यासाठीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात येतंय. यासोबतच व्हॉट्सअॅप आपल्या नवीन अपडेटमध्ये कम्युनिटी अपडेट आणण्यावरही काम करत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अजूनही एक फिचर आणत आहे जे आयफोन आणि आयपॅडसह iOS वापरकर्त्यांना वेगळ्या चॅटमध्ये व्हॉइस संदेश पाठवण्याची परवानगी देते. हे अपडेट वापरकर्त्यांना चॅट विंडोच्या बाहेर व्हॉइस मेसेज आणि ऑडिओ फाइल प्ले करण्यास अनुमती देते, अशी माहीती आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit