SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुकानदारांनाही मिळणार ‘पेन्शन’, मोदी सरकारकडून खास योजना सुरु..!

देशातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोदी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात यावा, त्याला सुखाचे दोन क्षण मिळावेत, यासाठी या योजना राबवल्या जातात. वृद्धापकाळात अनेकांची आर्थिक ओढाताण होत असल्याची बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने छोट्या दुकानदारांसाठी खास योजना सुरु केलीय..

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS), असे या योजनेचे नाव.. 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पूर्वी नोकरदारांनाच पेन्शनची सुविधा मिळत होती. मात्र, आता शेतकऱ्यांसह छोट्या दुकानदारही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात.. स्वत:चा व्यवसाय असणारे दुकानदार वयाच्या 60 वर्षांनंतर या पेन्शन (Pension scheme) योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

लाभार्थी कोण असतील..?
राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत किरकोळ व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार करणाऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा किमान 3000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे..

योजनेसाठी अटी
– राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल दीड कोटी किंवा त्यापेक्षा कमी असायला हवी.
– ही एक ऐच्छिक योजना असून, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिकाला दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळेल.
– आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक असेल.
– 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत नोंदणी करु शकतात.
– पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी देशातील 3.25 लाख सामान्य सेवा केंद्रांवर नोंदणी करू शकतात.

Advertisement

आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– बचत बँक खाते
– जन-धन खाते क्रमांक

नॉमिनीलाही लाभ
‘एनपीएस’ योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीने ‘नाॅमिनी’ केलेल्या व्यक्तीला (पती/पत्नी) अर्जदाराच्या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम ‘कुटुंब निवृत्ती वेतन’ म्हणून दिली जाणार आहे.

Advertisement

अधिक माहितीसाठी
Labor.gov.in
maandhan.in

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement