SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकार देणार विनातारण व बिनव्याजी कर्ज, मोदी सरकारची भन्नाट योजना..!

कोरोनामुळे अनेकांच्या हाताला काम राहिले नाही. आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने छोटे व्यापारी, व्यावसायिकांवर मोठे आर्थिक कोसळले. अशा व्यावसायिकांना पुन्हा उभारी देण्यासाठी मोदी सरकारने जून 2020 मध्ये एक खास योजना सुरु केली.  पंतप्रधान स्वनिधी योजना (Prime Minister’s Swanidhi Yojana) असे या योजनेचे नाव..

पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून देशातील फेरीवाल्यांसाठी विनातारण व बिनव्याजी लोन (loan) उपलब्ध करून दिले जाते. देशातील सुमारे 50 लाख फेरीवाल्यांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

केंद्र सरकार फेरीवाल्यांना या योजनेच्या माध्यमातून एक वर्षासाठी खेळते भांडवल म्हणून 10 हजार रुपये बिनव्याजी व विनातारण उपलब्ध करून देणार आहे. शिवाय कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास लाभार्थ्यांना व्याजावर 7 टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच डिजिटल व्यवहार केल्यास लाभार्थ्यांना 1200 रुपयांपर्यंत कॅशबॅक (cashback) सरकारतर्फे देण्यात येणार आहे..

मोदी सरकारने ही योजना सुरू केल्यापासून एकट्या मुंबई शहरातील सुमारे 13 हजार फेरीवाल्यांनी याेजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती देण्यात आली..

Advertisement

असा करा अर्ज..

  • पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम pmsvanidhi.mohua.gov या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपणास 10 हजार रुपये, तसेच 20 हजार रुपये कर्ज मिळवण्यासाठी लिंक मिळेल, वेबसाइटच्या वरच्या बाजूला शिफारसपत्रही सरकारने उपलब्ध करून दिले आहे.
  • लिंकवर ‘क्लिक’ केल्यावर आधार क्रमांकाला लिंक असणारा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल. नंतर कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होईल.

असे मिळेल बिनव्याजी कर्ज..
दरम्यान, पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर डिजिटल व्यवहार केल्यास, तसेच वेळेवर कर्ज परतफेड केल्यास कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. अर्थात आपणास बिनव्याजी कर्ज मिळेल. डिजिटल व्यवहार केल्यास सरकारकडून ‘कॅशबॅक’चाही लाभ मिळणार आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement