SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीच्या परीक्षा पुन्हा अडचणीत, विद्यार्थ्याची कोर्टात धाव..!

दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या, तरी ऑफलाईन-ऑनलाईन हा वाद सुरुच आहे.. काही दिवसांपूर्वी ‘हिंदूस्थानी भाऊ’च्या आवाहनावरुन राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवला, तर आता परीक्षा ऑफलाईन का, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे..

मात्र, राज्य शिक्षण मंडळ दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यावर ठाम आहे. राज्यात आता कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असल्याने परीक्षा रद्द करण्याचा अथवा ऑनलाईन घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे. मात्र, त्यानंतरही हा वाद मिटलेला नाही..

Advertisement

आता औरंगाबाद येथील सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High court Bench) याचिका दाखल केली आहे. येत्या मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी-बारावीच्या (SSC, HSC Exams) परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती याचिकेत केली आहे..

याचिकेत काय म्हटलंय..?
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम झाला आहे. विद्यार्थी तणावात आहेत. शाळा नियमित न झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आले आहे. दहावी-बारावीची परीक्षा शक्यतो ऑनलाइन घ्याव्यात किंवा अभ्यासासाठी दोन महिने परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती याचिकेत केली आहे.

Advertisement

तसेच, 4 फेब्रुवारी रोजी परीक्षेबाबत दिलेली अधिसूचना रद्द करण्याची विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे अपेक्षित आहे. याचिकाकर्ता विद्यार्थ्यातर्फे अॅड. बाबासाहेब भाले काम पाहत आहेत.

परीक्षेचे वेळापत्रक
बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत. त्यानंतर बोर्डाची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत होणार आहे.. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळात होणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement