SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बच्चन पांडे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, खिलाडी अक्षय कुमारचा जबरदस्त लूक, पाहा व्हिडीओ..

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे चित्रपटाचा ट्रेलर आज यूट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. बच्चन पांडे’ Bachchan Pandey चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमारचे रौद्र रूप दिसत आहे. अक्षय या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे.

बच्चन पांडेच्या ट्रेलरची सुरुवात अक्षय कुमारच्या भयानक स्टाईलने होते. ट्रेलरवरून दिसते की, अक्षय कुमारचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. अक्षयचा हा नवा लूक सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटातील लूकचा अंदाज या ट्रेलरमधून आपल्याला येईलच.

Advertisement

क्रिती सेननने चित्रपटात दिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे जी व्यवसायाने दिग्दर्शक आहे आणि तिला बच्चन पांडेवर कोणत्या ना कोणत्या मार्गाने चित्रपट बनवायचा आहे. बच्चन पांडेवर चित्रपट बनवण्यासाठी ती विशूची (अर्शद वारसी) मदत घेते आणि या प्रवासात तिला बच्चन पांडेच्या अनेक छटा पाहायला मिळतात.अनेकांचे लक्ष या ट्रेलरने वेधले आहे. जबरदस्त डायलॉग्ज या चित्रपटात आहेत, जे प्रेक्षकांचं अफलातून मनोरंजन करेल.

Advertisement

बच्चन पांडे’ सिनेमा 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे कथानक एका गँगस्टरवर आधारित आहे. या सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबतच अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आज या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बच्चन पांडेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘धूम धड़ाका रंग पटाखा, आओ बना लो टोली… इस बार बच्चन पांडे ला रहे हैं। होली पे गोली !’, असं हटके कॅप्शन देऊन अक्षय कुमारनं या चित्रपटाचा ट्रे्लर शेअर केला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement