SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भर मैदानात विराट कोहली इशान किशनवर भडकला, “अरे माझ्याकडे बघ ना..”, वाचा मैदानात काय घडलं..

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने रोहित शर्माच्या 19 चेंडूंतील 40 धावा आणि सुर्यकुमार यादवच्या 34 धावा यांच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 6 विकेट्स राखून पराभव केला वेस्ट इंडिजने दिलेले 158 धावांचे लक्ष्य भारताने 18.5 ओव्हरमध्ये 162 धावा करून पार केले. गेल्या कित्येक दिवसांपासून जेमतेम धावसंख्या उभारणारा विराट कोहली काल आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक होताना दिसला.

तत्पूर्वी, पहिल्या टी-20 सामन्यात सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजच्या संघाने निर्धारीत 20 षटकात 7 बाद 157 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजसाठी निकोलस पूरनने (Nicholas Pooran) सर्वाधिक 61 धावा केल्या. त्याने 43 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 61 धावांची जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. हा आहे देशातील सर्वात महागडा चहा ; किंमत ऐकून होताल चक्कीत

Advertisement

 

भारताकडून काल चमकणाऱ्या चेहऱ्यामध्ये बोलायचं झालं तर हर्षल पटेलने (Harshal Patel) 2 विकेट्स घेतल्या तर रवी बिश्नोईने 11व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रोस्टन चेसला (4) पायचीत केले आणि पाचव्या चेंडूवर रोवमन पॉवेल (2) ला बाद केले. पदार्पणवीर रवी बिश्नोईने (Ravi Bishnoi) 4 षटकांत 17 धावा देताना 2 विकेट्स घेऊन टीममध्ये आपलं स्थान जवजवळ पक्कं केलंय. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 7 बाद 157 धावा केल्या. किरॉन पोलार्ड 24 धावांवर नाबाद राहिला

Advertisement

वेस्ट इंडिजची फलंदाजी झाल्यावर सलामीला आलेल्या रोहित व इशान किशन (Rohit Sharma-Ishan Kishan) यांनी तुफान सुरूवात केली. केवळ 29 चेंडूंमध्ये अर्धशतकी पार्टनरशीप केली आणि फलकावर 64 धावा होताच रोहित शर्मा बाद झाला. ओडीन स्मिथच्या पहिल्याच षटकात रोहितने 22 धावा चोपल्या. त्यात 2 चौकार व 2 षटकार मारले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 7.3 षटकांत 64 धावांची भागीदारी केली. रोस्टन चेसच्या 8व्या षटकात रोहित बाद झाला. रोहितने 19 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 40 धावा केल्या.

पण विराट का भडकला? हा आहे देशातील सर्वात महागडा चहा ; किंमत ऐकून होताल चक्कीत

Advertisement

भारत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळत असताना विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर आल्यानंतर त्याने 13वी धाव घेतली असता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली दुसऱ्या नंबरवर आला आहे. पण सामन्यात विराट हा इशानवर थोडासा भडकलेला दिसला.

रोस्टन चेसने टाकलेल्या 10व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशान किशन चेंडूला फटका मारण्यापासून चूकला, पण तो चेंडू पॅडला लागला आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेला. यावेळी विराटने क्रिज सोडले आणि इशानही धाव घेण्याच्या प्रयत्नात पुढे आला होता. यष्टिरक्षक निकोलस पूरनने आणि चेसने थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या ओडिन स्मिथला चेंडू थ्रो करण्याचं सांगितलं. यामध्ये स्मिथ एवढा गोधळून गेला की त्याने चेंडू चेसच्या दिशेनं फेकला, तोपर्यंत विराट पुन्हा क्रिजवर परतला होता. त्यानंतर विराट इशानकडे बघून, “अरे माझ्याकडे बघ..!”, असं म्हणाला. यावेळी विराटच्या चेहऱ्यावर बघण्यासारखे हावभाव होते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement