सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. भारतीय नौदलात (Indian Navy Jobs) दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 1531 जागांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या संपूर्ण भरतीची माहिती, नौदलाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
एकूण जागा – 1531
या पदासाठी भरती
ट्रेडमन (Trade man) – कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)
शैक्षणिक पात्रता
– उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक.
– उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा..
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं.
– उमेदवारांनी नेव्हल डॉकयार्ड्समधून ‘आयटीआय’ (ITI) इंटर्नशिप केलेली असावी किंवा लष्कर/नौदल/हवाई दलाच्या योग्य तांत्रिक शाखेत टेक्निकल विभागात किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
– उमेदवारांनी पदभरतीसाठीच्या सर्व अटी-शर्ती पूर्ण केेलेल्या असाव्यात.
निवड कशी होणार..?
उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते. नंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवारांची निवड होणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज भरण्याची तारीख लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे..
इथे करा अर्ज- https://www.joinindiannavy.gov.in/