SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्राहकांनी सोडली ‘जिओ’ची साथ, दरवाढीचा फटका, तर ‘या’ कंपनीचे ग्राहक वाढले..!

टेलिकाॅम कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली होती. त्याचे परिणाम आता समोर येताना दिसत आहेत. अनेक ग्राहकांनी टेलिकाॅम क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्याचा सर्वाधिक फटका ‘रिलायन्स जिओ’ व ‘वोडाफोन-आयडिया’ या दोन कंपन्यांना बसल्याची आकडेवारीतून समोर आलेय.

‘भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण’ अर्थात ‘ट्राय’ (TRAI)कडून डिसेंबर-2021 या महिन्यातील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार ‘रिलायन्स जिओ’ने डिसेंबर-2021 मध्ये तब्बल 12.1 मिलियन ग्राहक गमावले आहेत. त्याच वेळी याच महिन्यात 16 लाख ग्राहकांनी वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea (Vi) यांची साथ सोडलीय.

Advertisement

दरम्यान,  यो दोन कंपन्यांना ग्राहक गुड बाय करीत असताना, ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (BSNL) व ‘भारती एअरटेल’ यांच्या ग्राहक संख्येत अनुक्रमे 1.1 मिलियन व 0.47 लाख ग्राहक जोडले गेल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.

बाजारातील भागीदारीचा विचार केल्यास ‘रिलायन्स जिओ’कडे (Reliance Jio) 26 टक्के, त्यापाठोपाठ ‘भारती एअरटेल'(Airtel)कडे 30.81 टक्के, ‘वोडाफोन आयडिया’कडे 23 टक्के, तर ‘बीएसएनएल’ व ‘एमटीएनएल’कडे क्रमशः 9.90 टक्के व 0.28 टक्के मार्केट शेअर आहे.

Advertisement

‘बीएसएनएल’कडे ग्राहक वळले..
विशेष म्हणजे, सध्या ‘बीएसएनएल’चे 4G नेटवर्क उपलब्ध नसतानाही, ग्राहक ‘बीएसएनएल’ची निवड करीत आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांना गेल्या वर्षीच्या अखेरीस टॅरिफ प्रीपेड प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्यानेच कमी किंमतीचा रिचार्ज करणारे ग्राहक या खासगी टेलिकॉम कंपन्यांपासून दूरावल्याचे बोलले जात आहे.

डिसेंबर-2021 मध्ये तब्बल 8.54 मिलियन यूजर्सने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची (एमएनपी) विनंती केली. त्यातील 4.91 मिलियन झोन-1, तर 3.63 मिलियन विनंत्या झोन-2 मधून आल्या आहेत. ‘एमएनपी झोन-1’मध्ये पोर्टेबिलिटीसाठी सर्वाधिक रिक्वेस्ट महाराष्ट्रातून आल्या आहेत. ‘एमएनपी झोन-2’मध्ये उत्तर प्रदेशातील आकडा सर्वाधिक आहे.

Advertisement

दरम्यान, डिसेंबर-2021 पर्यंत ‘जिओ’ची ग्राहक संख्या 41.57 कोटी, ‘एअरटेल’ 35.57 कोटी, तर वोडाफोन-आयडीयाची ग्राहक संख्या 26.55 कोटी असल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement