SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चाणक्य नीति : जीवनात ‘या’ चार गोष्टींचा आदर करा, काहीच कमी पडणार नाही…!

महान अर्थतज्ज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली. त्याद्वारे त्यांनी समाजाला माेलाचे मार्गदर्शन केलंय.. आचार्य चाणक्य यांच्या सल्लांचे पालन करणाऱ्यांची जीवनात मोठी प्रगती होत असल्याचे मानले जाते. सत्ता, संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर व वैवाहिक जीवनात कसे वागावे, राहावे, बोलावे, याबाबत चाणक्यांनी सखोल वर्णन केलंय..

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात चार गोष्टींना सर्वोच्च स्थान दिलंय. प्रत्येक व्यक्तीने जीवनात या चार गोष्टी पाळल्या पाहिजेत, असे चाणक्य म्हणतात. या नेमक्या चार गोष्टी कोणत्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

आईला सर्वाेच्च स्थान
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्रात गुरु, देवी-देवतांपेक्षाही आईला संपूर्ण जगात सर्वोच्च स्थान दिले आहे. अनेक त्रास सहन करीत आई 9 महिने आपल्या बाळाला पोटात ठेवते. त्यामुळे आईचे ऋण कधीच फेडू शकत नाही. आईचा आदर करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.

अन्नदान- महान दान
अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचे चाणक्य म्हणतात. अन्न-पाणी दान केल्याने गरजूंचा आशीर्वाद मिळतो.. गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न देणाऱ्या व्यक्तीपेक्षा या जगात कोणीही मोठा नाही.

Advertisement

गायत्री मंत्र हा महामंत्र
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्रात जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र ‘गायत्री’ मंत्र आहे. ऋग्वेदातून हा मंत्र रचला आहे. या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात शक्ती, दीर्घायुष्य नि अपार संपत्ती मिळत असल्याचे चाणक्य म्हणतात..

एकादशीला विष्णू पूजा
एका वर्षात साधारण 24 एकादशी असतात. त्यात कार्तिक महिन्यातील ‘देवूठाणी’ एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्तीची सर्व पापे, दुःख दूर होतात. एकादशी तिथीची पूजा केल्याने अधिक फळ मिळत असल्याचे चाणक्य यांनी म्हटले आहे..

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement