SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता अ‍ॅपमध्ये आयडी-पासवर्ड न टाकता बॅलन्स चेक करता येणार, ‘या’ बँकेने आणलंय खास फिचर

देशातील सर्वात मोठी असणाऱ्या State Bank of India च्या डिजिटल सेवांबाबत आपणाला माहीत असेलच. इंटरनेट बँकिंग, डेबिट-क्रेडीट कार्ड्स (Debit & Credit Cards) आणि Yono SBI अ‍ॅपच्या माध्यमातून आपण बँकेच्या अनेक सुविधांचा वापर करतो.

अनेकदा लोकांना अनोळखी व्यक्तीचा कॉल येतो आणि कोणाच्या ना कोणाच्या खात्यातून पैसे चोरी होऊन बँक खातं रिकामं होतं. त्यामुळेच एसबीआय (SBI) बँकेच्या सेवा लाखो युजर्सना योनो अ‍ॅपने अधिक सुरक्षित वापरता याव्यात, यासाठी नवीन अपडेट आणि वैशिष्ट्ये समाविष्ट करत बँक हे अ‍ॅप चांगलं बनवण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्न करत आहे. एक लाखापर्यंत पर्सनल लोन एका मिनिटात ; ‘गुगल-पे’कडून खास सेवा सुरु, असा घ्या लाभ 

Advertisement

 

आता तुम्हाला लॉगिन न करता बँक तुमचे अकाऊंट बॅलेन्स चेक करता येणार आहे. आता बँकेने SBI Insurance, SBI Personal Loan, SBI Home Loan सारख्या सेवा ऑनलाईन केल्यानंतर आणखी एक धमाकेदार फिचर Yono SBI मध्ये आणलं आहे. ज्याचा वापर करुन घरबसल्या तुमच्या बँक अकाऊंटचा तपशील तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रथम योनो अ‍ॅप अपडेट करुन घ्यावे लागेल.

Advertisement

स्टेट बँकेच्या Yono SBI अ‍ॅपमध्ये काही नविन वैशिष्ट्ये:

▪️ तुम्हाला बँक अकाऊंटचे तपशील पाहण्यासाठी आता अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्याची गरज भासणार नाही. तुमच्या मोबाईलमधे फक्त Yono SBI हे अ‍ॅप इन्स्टॉल करा.

Advertisement

▪️ मग 6 अंकी MPIN टाकून तुम्ही फक्त बॅलन्स चेक करू शकता. (किंवा यूजर आयडी आणि पासवर्ड टाकूनही तुम्ही खात्याचे सर्व तपशील पाहू शकता.)

▪️ SBI Yono अ‍ॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील, लॉगिन (login), शिल्लक पहा (view balance), जलद पैसे पाठवा (quick pay) असेही पर्याय असतील. एक लाखापर्यंत पर्सनल लोन एका मिनिटात ; ‘गुगल-पे’कडून खास सेवा सुरु, असा घ्या लाभ 

Advertisement

▪️ मग तिथेच अ‍ॅप शिल्लक पहा (View Balance) या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त MPIN टाकणे आवश्यक आहे आणि तुम्हाला लगेच खात्याची शिल्लक रक्कम दिसेल.

▪️ योनो अ‍ॅपशी लिंक केलेल्या सर्व खात्यांची शिल्लक तुम्ही ऑनलाईन एका क्लिकवर तपासू शकता.

Advertisement

▪️ सोबतच खात्यातील शिल्लक व्यवहार पाहण्यासाठी ‘व्यवहार पहा’ (View Trasaction) हा पर्याय उपलब्ध असेल, ज्यावर तुम्ही निवडक खात्यांचे एम-पासबुकही पाहू शकता.

एसबीआय ‘योनो क्विक पे’ (Yono Quick Pay) चे वैशिष्ट्य:

Advertisement

जर तुम्हाला तात्काळ पैसे पाठवायचे असतील तर ‘Yono Quick Pay’या पर्यायाचा वापर केला तर तुम्ही अ‍ॅपमध्ये लॉगिन न करता जवजवळ 25 हजार रुपयांपर्यंत व्यवहार करता येऊ शकतात. यासाठी प्रमाणीकरण करावे लागेल. हे प्रमाणीकरण MPIN / बायोमेट्रिक / फेस आयडी / युजर आयडी आणि पासवर्ड यांपैकी एकाच्या माध्यमातून करावे लागते.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement