गेल्या काही दिवसांत बॅंकांच्या मुदत ठेवीवर व्याजदरात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. 2011 मध्ये वृद्धांना सर्वाधिक 9.75 टक्के व्याजदर मिळत होता. आता तो 6 टक्क्यांवर आलाय. त्यामुळे अनेकांनी गुंतवणुकीसाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली. परिणामी, बॅंकेत येणारा पैशांचा ओघ आटला होता. ही बाब लक्षात घेऊन बॅंकांनी ठेवीवरील व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली आहे..
देशातील खासगी क्षेत्रातील अव्वल असणाऱ्या ‘एचडीएफसी’ (HDFC) बॅंकेने ठेवीवरील (fixed deposite) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर त्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 0.05 ते 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. व्याजातील ही दरवाढ बँकेने 14 फेब्रुवारीपासूनच लागू केली आहे. सर्वात्तम आरोग्य सेवा देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र 64.53 गुणांसह देशात तिसरा; केंद्र सरकारच्या ‘या’ अहवालाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत मांडा
‘एचडीएफसी’ बँकेच्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेव ठेवता येते. या मुदत ठेवीवर 2.50 टक्के ते 5.60 टक्क्यांच्या दरम्यान व्याज दर मिळतो. तसेच ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर अधिक व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदर 3 टक्के ते 6.35 टक्के असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
‘एचडीएफसी’ बँकेने 1 वर्षाच्या ‘एफडी’वर आता 4.9 टक्क्यांवरून 5 टक्के व्याजदर केला आहे. अशा प्रकारे बँकेने व्याजात 0.10 टक्के वाढ केलीय. 1 ते 2 वर्षांच्या ठेवीवर 5 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5.2 टक्के व्याजदर ठेवला आहे.
सविस्तर व्याजदर (कंसात ज्येष्ठांसाठीचा)
- 7-14 दिवस – 2.50 % (3.00%)
- 15-29 दिवस – 2.50 % (3.00%)
- 30-45 दिवस – 3.00 % (3.50%)
- 46-60 दिवस – 3.00 % (3.50%)
- 61-90 दिवस – 3.00 % (3.50 %) सर्वात्तम आरोग्य सेवा देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र 64.53 गुणांसह देशात तिसरा; केंद्र सरकारच्या ‘या’ अहवालाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत मांडा
- 91 दिवस से 6 महिने – 3.50 % (4.00%)
- 6 महिने 1 दिवस ते 9 महिने – 4.40% (4.90%)
- 9 महिने 1 दिवस – 1 वर्षापेक्षा कमी – 4.40 % (4.90%)
- 1 वर्ष – 5. 0% (5.50%)
- 1 वर्ष 1 दिवस – 2 वर्षे – 5.00 % (5.50%)
- 2 वर्षे 1 दिवस – 3 वर्षे – 5.20 % (5.70%)
- 3 वर्षे 1 दिवस – 5 वर्षे – 5.45 % (5.90%)
- 5 वर्षे 1 दिवस – 10 वर्षे – 5.60 % (6.35%)
‘एसबीआय’कडूनही व्याजदरात वाढ
दरम्यान, केंद्रिय अर्थसंकल्पापूर्वी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक ‘एसबीआय'(SBI)नेही ‘एफडी’वरील व्याजदरात वाढ केली होती. बँकेने 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ‘एफडी’वरील व्याजदर 5 टक्क्यांवरून 5.1 टक्के केला आहे. यापूर्वी इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सेंट्रल बँक आणि युको बँकेनेही ‘एफडी’वरील व्याजदरात वाढ केली होती.