SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘नो कॉस्ट ईएमआय’ म्हणजे काय? हप्त्यांवर वस्तू घेताना 0% व्याजदराचाही कंपनीलाच फायदा..

कित्येक दशकांपासून आपलं जीवन बदलत चाललं आहे. आताचं युग हे डिजीटल युग आहेच पण सगळ्या दृष्टीने जे बदलत चाललंय, त्यात तंत्रज्ञानाने विशेष भूमिका निभावली. सध्या आपल्यापैकी बरेच जण डिजीटल पेमेंट करतात. आपल्याला हप्त्यांवर Smartphone घायचा असो की Bank Loan घ्यायचं असो येथे लोन म्हणजेच कर्ज घेणे किंवा कर्ज घेऊन वस्तू घेणे यामध्ये हप्ता भरणं आलंच. मग तो व्याजासहित असो वा बिनव्याजी असो, भरावा तर लागणारच..!

मग जाणून घ्या नो कॉस्ट ईएमआयबद्दल..

आता तुम्हाला छान उदाहरण द्यायचं ठरवलं तर याशिवाय दुसरं चांगलं असणार नाही. तर बाजारात तुम्हाला एक शब्द सारखा कानी पडत असेल, ऑनलाईन पाहायला मिळत असेल तो म्हणजे NO COST EMI हा आहे. आता आधीचे लोक ओळख असली की उधारीवर लोकल मार्केटमधून मोबाईल घ्यायचे पण सध्या ही संकल्पना बदलली आहे. आता लोक ऑनलाईन सुद्धा EMI वर अनेक वस्तू घेतात.

 

Advertisement

व्हॅलेंटाईन वीकनंतर आता अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरु; या आठवड्यात कोणकोणते दिवस साजरे केले जातात

तुम्ही मोबाईल, फ्रिज, टीव्ही, कपडे, जास्त किंमतीच्या वस्तू उपलब्धतेनुसार, EMI वर ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करु शकता. बाजारात सध्या अनेक बँका (Bank No Cost Emi Offer) चा पर्याय ग्राहकांना देतात. तुमच्याकडे संबंधीत बँकेचे डेबिट कार्ड (Bank Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) असेल तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

सामान्य लोक पैशाअभावी एखादी महागडी गोष्ट खरेदी करताना EMI Card चा पर्याय निवडतात. जर ग्राहकाला वस्तूची पूर्ण किंमत एकदाच भरता येत नसेल तर कंपनी त्याला Monthly installment (महिन्याला हप्ता) मध्ये पैसे भरण्याची सोय करून देते. कंपनी दावाही करते की एखादी वस्तू तुम्हाला शुन्य व्याजदरात मिळणार आहे.

उदाहरण: तुम्ही 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल खरेदी केला तर कंपनी तुम्हाला 3, 6, 1 वर्ष या प्रमाणे EMI यांपैकी एक पर्याय निवडायला सांगून महिन्याच्या एका ठराविक तारखेला काही रकमेचा हप्ता भरायला सांगते. त्यावर कुठेलेही जास्त पैसे म्हणा किंवा व्याज आकारले जात नाही, असा कंपनी दावा करते. त्यामुळे तुम्ही पैसे कमी असतानाही गोष्टी EMI वरती खरेदी करु शकता.

खरेदी तुमची, फायदा कंपनीचाच..!

महत्वाचं म्हणजे कंपनी तुम्हाला NO COST EMI वरती एखादी वस्तू विकताना त्यावर जी सूट देणार असते ती सूट काढून घेऊन ती वस्तू आहे तेवढ्याच किंमतीमध्ये तुम्हाला विकते. म्हणजेच एखादी 15 हजार रुपयांची वस्तू 10 टक्के, 20 टक्के डिस्काऊंटवर मिळत असेल, तर ती तुम्ही NO COST EMI हा पर्याय निवडून हप्त्याने घेतली तर ती सूट मिळत नाही आणि तुम्हाला आहे त्या किंमतीमध्ये मोबाईल खरेदी करावा लागतो. याशिवाय कंपनी किंवा दुकानदार तुम्हाला Life Insurance ही काढून देऊन अधिक पैसे कमवतात.

बर्‍याच वेळा असंही होतं की, किरकोळ विक्रेते आधीच उत्पादनाच्या किमतीत व्याज आकारतात आणि नंतर तुम्हाला नवीन किंमतीवर NO COST EMI ची सुविधा मिळते. म्हणजेच जर तुम्ही लॅपटॅप खरेदी केला आणि कंपनी 50 हजार रुपयांच्या लॅपटॉपची किंमत आधीच 55 हजार करुन ठेवते, मग ग्राहकांना 55 हजार रुपयांच्या किंमतीवर EMI भरावा लागतो, असे फायदे कंपनीला होतात. मात्र तुम्हाला अत्यंत गरज असली किंवा पैसे कमी असले तर काही जास्तीचे पैसे जरी गेले, तरी तुमची ही निवड तुम्हाला फायद्याची ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा

Advertisement