SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

मेष (Aries) : टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करा. निर्धारित कामे पूर्ण कराल. दिवस मनाजोगा घालवाल. कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल.

वृषभ (Taurus) : धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल. नीतीचा मार्ग अवलंबाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

मिथुन (Gemini): फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. सहकारी सहकार्य करतील. कुटुंबातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल.लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

Advertisementकर्क (Cancer) : डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल.

सिंह (Leo) : मन आनंदी राहील. त्यामुळे सृजनशील साहित्यरचना कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.
विद्यार्जन करणार्‍यांना चमक दाखविता येईल.

कन्या (Virgo): प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मानसिक संतुलन जपण्याचा सल्ला देत आहेत. मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन कराल.

Advertisementतूळ (Libra) : आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्योदय होईल. भावंडांचे सहकार्य मिळेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

वृश्चिक (Scorpio) : नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख- शांती लाभेल. पत्नी, मुलगा, वडीलधारे यांचेकडून लाभ होईल.

धनु (Sagittarius) : सर्दी, खोकला यांमुळे तब्बेत खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. निषेधार्ह आणि अनैतिक कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा.

Advertisementमकर (Capricorn) : . धन खर्च वाढेल. कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिगत होतील. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्या.

कुंभ (Aquarius) : भविष्याचा विचार करून योजना आखा. घरासाठी खरेदी कराल. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल.

मीन (Pisces) : मनाचा गोंधळ टाळावा. आत्ममग्न राहाल. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल.

Advertisement