SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘पेटीएम’ही देणार 5 लाखांपर्यंत कर्ज, कोणत्याही गॅरंटीची गरज नाही..!

छोट्या व्यापाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अनेकदा व्यवसायात भांडवलाची कमतरता पडते. अशा वेळी लोनसाठी बॅंकांच्या दारात जावे लागते. मात्र, बॅंकांकडून अनेकदा कर्जदारांची अडवणूक केली जाते. अशा वेळी बरेच जण खासगी सावकारापुढे हात पसरतात. मात्र, आता त्याची गरज पडणार नाही..

व्हॅलेंटाईन वीकनंतर आता अँटी व्हॅलेंटाईन वीक सुरु; या आठवड्यात कोणकोणते दिवस साजरे केले जातात

Advertisement

डिजिटल व्यवहाराची सोय देणाऱ्या ‘पेटीएम’ (Paytm) ने छोट्या व्यापाऱ्यांसाठी खास ऑफर सुरु केली आहे. त्यानुसार छोट्या व्यापाऱ्यांना चक्क 5 लाखांपर्यंत कोणत्याही हमीशिवाय लोन (Loan) घेता येणार आहे. हे लोन तुम्हाला रोज फेडता येईल. त्यासाठी ‘पेटीएम’ने ‘डेली ईएमआय’ (EMI)चा पर्याय दिला आहे.

‘शेड्युल कमर्शियल’ बँका आणि ‘एनबीएफसी’ (NBFC) सोबत ‘पेटीएम’ने भागीदारी केली आहे. हे कर्ज घेण्यासाठी ‘पेटीएम फॉर बिझनेस अ‍ॅप’मधील (Paytm For Business) ‘मर्चंट लेंडिंग प्रोग्राम’मध्ये (Merchant Lending Program) जावे लागेल. ‘पेटीएम’चे ‘अल्गोरिदम’ व्यापाऱ्याच्या दैनंदिन व्यवहारांच्या आधारे त्याची क्रेडिट-योग्यतेची तपासणी करील.

Advertisement

‘पेटीएम लोन’ची वैशिष्ट्ये
– पूर्णपणे डिजिटल कर्ज अर्ज प्रक्रिया असून, कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची गरज नाही..
– कर्जाची परतफेड प्रामुख्याने ‘पेटीएम’सह व्यापाऱ्याच्या दैनंदिन सेटलमेंटद्वारे केली जाते.
– वेळेआधी एकाच वेळी कर्ज भरले, तरी प्री-पेमेंट शुल्क द्यावे लागत नाही.

दरम्यान, ‘पेटीएम’च्या अहवालानुसार, या प्लॅटफॉर्मवर वितरित केलेल्या व्यापारी कर्जाची संख्या वार्षिक 38 टक्क्यांनी, तर व्यापारी कर्जाचे मूल्य वार्षिक 128 टक्क्यांनी वाढले आहे. नवीन कर्जदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त कर्जे वितरित केल्याचे अहवालात नमूद केले आहे..

Advertisement

कसे मिळणार लोन…?
– ‘पेटीएम फॉर बिझनेस अ‍ॅप’च्या होम स्क्रीनवरील ‘बिझनेस लोन’ (Business Loan)वर क्लिक करुन, तुमच्यासाठी ऑफर तपासा. गरजेनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.
– एकदा रक्कम निवडल्यानंतर कर्जाची रक्कम, वितरित केलेली रक्कम, एकूण देय रक्कम, दैनिक हप्ता, कार्यकाल इ. तपशील पाहा.

– चेक बॉक्सवर क्लिक करा व पुढे जाण्यासाठी ‘गेट स्टार्टेट’ (Get Started) वर टॅप करा. कर्जाचा अर्ज जलद पूर्ण करण्यासाठी ‘केवायसी’ (KYC) तपशील ‘सीकेवायसी’ (CKYC)कडून मिळवण्यास संमती देऊ शकता.
– पुढील स्क्रीनवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड, जन्मतारीख, ई-मेल, पत्ता या तपशीलांची पडताळणी करा. नंतर ऑफरच्या पुष्टीकरणासह पुढे जा. पॅन तपशील, क्रेडिट स्कोअर, ‘केवायसी’ची पडताळणी केली जाईल.
– कर्जाचा अर्ज सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक तपशील इत्यादी काळजीपूर्वक भरा.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement