SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: 10वी, 12वी परीक्षांसाठी कोरोना लसीकरण सक्तीचे? जाणून घ्या नेमकं काय झालाय निर्णय..

राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये यंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोईस्कर असे बदल केलेत. राज्यात सर्वत्र लसीकरणाचे वारे असताना बोर्ड परिक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न बोर्डाने केला आहे. मग विद्यार्थ्यांना लसीकरण गरजेचे आहे की नाही याबाबत जाणून घेऊ..

बोर्ड परिक्षांना लसीकरण अनिवार्य..?

Advertisement

राज्यातील शिक्षण संचालनालयानं कोरोना लसीकरण हे (Corona Vaccination) दहावी आणि बारावीच्या परीक्षेपूर्वी करण्याचं नियोजन केलं आहे आणि सोबतच विद्यार्थ्यांना लस घेण्याचं आवाहन जरूर केलं आहे, पण परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्यांना लसीकरण सक्तीचे नसणार आहे.

 

Advertisement

युवा फलंदाज रिषभ पंतचे प्रमोशन ; कर्णधार रोहित शर्माने रिषभकडे दिली हि महत्वपूर्ण जबाबदारी

 

Advertisement

विद्यार्थ्यांनी परीक्षेस बसण्यापूर्वी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा परिक्षेवेळी विद्यार्थ्यांना सक्ती न करता पालकांची परवानगी घेऊनच लसीकरण करण्यात यावं, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागानं सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शाळांना दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव पाहता सध्या परिस्थिती जरी आटोक्यात असली, तरीही पूर्वकाळजी म्हणून लसीकरण करून घेणे महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले. यंदा बारावीची परीक्षा 4 मार्च तर दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होतेय. विद्यार्थ्यांना पेपरसाठी 15 ते 30 मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं परीक्षेपूर्वी लसीकरण करण्यात यावं, असा शासनाचा प्रयत्न आहे.

Advertisement

विद्यार्थ्यांचं लसीकरण हे परीक्षांसाठी अनिवार्य जरी नसलं तरी त्यानंतर ते करावं आणि परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे एक किंवा दोन्ही डोस घेण्यासाठी सक्ती न करता पालकांची संमती घेऊनच लसीकरण करण्यात यावं, असंही सांगण्यात आलंय. बारावीची परीक्षा 4 मार्च तर दहावीची परीक्षा 15 मार्च पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात यावं असा शासनाचा प्रयत्न आहे.

*माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या ठिकाणी शाळा असतील तेथे परीक्षा केंद्र असणार आहे. त्यांच्या शाळेतील शिक्षकांची परीक्षेस पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे आणि जर कोणी विद्यार्थ्याने कॉपी केली तर कॉपी प्रकरणांचा शोध घेण्यासाठी यावेळेस शेजारील शाळेतील शिक्षक तेथील परीक्षेवर नजर ठेवतील, कारण स्क्वाड यंदा नसणार आहे. विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement