SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: “याद आ रहा हैं…”, गायक बप्पी लहिरी यांचं दुःखद निधन!

प्रसिद्ध गायक-संगीतकार, एकाहून एक अतरंगी गाणी बनवून भारतावर वेगळीच छाप पाडणारे गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे दुःखद निधन झाले आहे. बप्पी यांचं अंगावर सोने घालण्याची स्टाईल, सोन्याच्या मोठमोठ्या माळा, अंगठी, आजही सगळ्यांना नक्कीच आठवते. काल (ता.15 फेब्रुवारी) रात्री अंदाजे 11.45 वाजेच्या दरम्यान मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते.

जाणून घ्या सविस्तर बातमी…

Advertisement

लांब केस, डोळ्यांवर चष्मा, सोन्याचे दागदागिने आणि रंगबेरंगी कपडे असा पेहराव करणारे प्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लहीरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी जलपैगुडी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. बप्पी यांना लॉकेट घालणे आवडते. त्यांच्याकडे असलेले श्रीगणेशाची प्रतिमा असलेले एक लॉकेट जे ते नेहमी घालतात. ब्रेसलेट घालण्याची देखील त्यांना प्रचंड आवड होती.

 

Advertisement

युवा फलंदाज रिषभ पंतचे प्रमोशन ; कर्णधार रोहित शर्माने रिषभवर सोपवली हे महत्वपूर्ण काम

 

Advertisement

बॉलिवूडमध्ये या अनोख्या नावाजलेल्या गायकाने हिंदी सिनेसृष्टीतील गाण्यांमध्ये बिनधास्तपणासोबतच पॉपचा तडका आणला. बप्पी लहीरी यांच्या आवाजातील गाण्यांनी आणि संगीताने बॉलिवूड मध्ये अधिक प्रसिद्धी मिळवून देऊन विश्वाला एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांची गाणी तरुणाईपासून वयस्कर माणसांपर्यंत इतकी मनामनात भरली होती की, आजही काही ओठांवर पुटपुटत आहेत.

बप्पी यांना पहिल्यांदा ओळख मिळाली 1976 मध्ये आलेला विशाल आनंद यांचा चित्रपट ‘चलते-चलते’मधून. बप्पी लहीरी यांना तशी 1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ चित्रपटात गाणं गाण्याचीही संधी मिळाली होती. मग त्यानंतर 1975 मध्ये ‘जख्मी’ या चित्रपटातून त्यांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील गाणी ही त्यांनी मोहम्मद रफी व किशोर कुमार यांसारख्या महान गायकांसोबत गायली होती. दिवसामागून दिवस गेले आणि आज ते अनंतात विलीन (Composer-Singer Bappi Lahiri Dies In Mumbai) झाले आहेत.

Advertisement

बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची जोडी आजपर्यंत चर्चेत राहिली. मिथुन यांचा अभिनय आणि रॉकस्टार बप्पी यांचं पॉप गाणं हे एकदम झक्कास कॉम्बिनेशन आजही ओळखलं जातं. मिथुन यांची डिस्को गाणी तर बप्पी यांचा आवाज आजही सांस्कृतिक कार्यक्रमांतुन लोकांना आपल्या तालावर नाचायला लावतो. एका मुलाखतीत त्यांनी अंगावर एवढं सोनं घालण्याचं कारण सांगितलं. उत्तर देताना ते म्हणाले, “जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं मी ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे”, असं बप्पीदांनी सांगितलं.

बिनधास्त बप्पी लहीरी यांचा प्रवास…

Advertisement

बप्पी लहरी यांच्या काही हिट गाण्यांपैकी ‘याद आ रहा है’, ‘सुपर डान्सर’, ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त’, ‘ऐसे जीना भी क्या जीना है’, ‘प्यार चाहिए मुझे जीने के लिए’, ‘रात बाकी’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘उह ला ला उह लाला’ ही आणि इतर बरीच एव्हरग्रीन आहेत, जी आजही कित्येकांच्या तोंडावर आहेत. बप्पी लहरी यांनी 80 आणि 90 च्या काळात त्यांनी हिंदीसोबतच बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड भाषांमधील गाणीही गायली आहेत.

आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवलं होतं. 2020 मध्ये ‘बागी 3′ सिनेमातील भंकस हे गाणं त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणं ठरलं. नमक हलाल, शराबी, हिम्मतवाला, साहेब, गुरू, घायल आणि रंगबाज’ यासारख्या चित्रपटांना संगीत दिले. ‘टॅक्सी नंबर 9211,’ ‘द डर्टी पिक्चर,’ ‘हिम्मतवाला,’ ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’ या चित्रपटातील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिलं. 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकाराला दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement