SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नोकरीत सामान्य स्थिती राहील. मुलांना यश मिळेल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. राजकीय व्यक्ती यशस्वी ठरतील. एखाद्या वादात पडू नका. लक्ष भटकेल पण वाट सोडू नका.

वृषभ (Taurus): काही कारणाने प्रवास करावा लागेल. मनात थोडे काळजीचे विचार राहतील. आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. श्वसनाचे विकार उद्भवू शकतात. धन आगमन होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवू शकतात.

मिथुन (Gemini) : खर्चाचे प्रमाण वाढेल. सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. सूप पिणे आवडेल.

 

Advertisement


कर्क (Cancer) : धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडीची खरेदी केली जाईल. कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. वेगात गाडी चालवू नका.

सिंह (Leo) : काहींची बदली होऊ शकते. नोकरीत गैरसमज होऊ शकतात. जीनवसाथीशी मधुर संबंध राहतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. व्यवसायाशी संबंधित लोक आपले ध्येय पूर्ण करू शकतील.

कन्या (Virgo) : व्यवसायात भरभराट होईल. तब्येतीची काळजी घ्या. मुलांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात. जोडीदारसंबंधित तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. सावकाश जेवण करा.

 

Advertisementतुळ (Libra) : जोडीदाराची चांगली साथ राहील. नोकरीत वादापासून दूर राहा. धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटेल.

वृश्‍चिक (Scorpio) : भाग्याची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. घरातील इतर व्यक्तीच्या कष्टाची जाणीव ठेवा.

धनु (Sagittarius) : प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. बीपीचा त्रास असलेल्या लोकांनी सावधानता बाळगा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आपली माणसेच धोका दिल्यासारखं वागतील पण पुन्हा जागेवर परत येतील.

 

Advertisementमकर (Capricorn) : महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न कराल. रोज सकाळी उठल्यानंतर बाहेर फिरू वाटेल

कुंभ (Aquarious) : अचानक फायदा होईल. मुलांना अनपेक्षितपणे चांगली संधी मिळेल. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी सतावेल. पोटाचे विकार संभवण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी लवकर घरी या. वडिलांशी बिजनेसबद्दल चर्चा होईल.

मीन (Pisces) : कुणी तरी ओळखीचे किंवा अनोळखी लोक सहकार्य करतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आबालवृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही इतरांसोबत व्यवस्थित वागा मगच त्यांच्याकडून हीच अपेक्षा करा.

Advertisement