इलेक्ट्रीक कार म्हटलं की, आपण सर्वात प्रथम बघतो ते चार्जिंग व्यवस्था आणि रेंज. देशात खूप इलेक्ट्रीक कार कंपन्या आहेत. अनेकांना इच्छा असूनही खरेदी करता येत नाही, कारण बहुतेक जण लाखोंच्या कार घेऊ शकत नाहीत, कारण त्या महाग असतात. आता आणखी काही कंपन्यांच्या ईव्ही कार लॉंच होत येत आहेत.
पाहा कोणती स्वस्तात मस्त कार येतेय..?
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत एका इलेक्ट्रीक कार (Electric Car) बद्दल जी अवघ्या साडे चार लाख रुपयांत तुम्ही खरेदी करून आपलं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. या कारचे बुकिंग सुरु झाले असून तुम्हीही ही कार बुक करू शकता. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
Strom Motors कंपनीने ही जबरदस्त इलेक्ट्रीक कार बनविली आहे. आकर्षक डिझाईन असणारी ही ई-कार (EV) बनविणाऱ्या Strom Motors कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. या कंपनीने ‘Strom R3’ या नावाने ही कार लॉंच केली आहे. या कारची साडे चार लाख एक्स शोरुम प्राईझ आहे आणि फक्त 10 हजार रुपये देऊन तुम्ही बुकिंग करू शकणार आहात.
‘Strom R3’ कार प्री-बुक करण्यासाठी क्लिक करा 👉 https://www.strommotors.com/
विशेष म्हणजे या कारला तीन चाके आहेत. पुढे दोन आणि मागे एक चाक आहे. या कारमध्ये दोन दरवाजे आणि दोन सीट आहेत. सोबतच मोठा सनरुफ आहे. मात्र, थ्री व्हिलरपेक्षा लूक एकदम वेगळा आहे. जर तुमचे रोजचे रनिंग 100 ते 150 किमी आहे तर तुम्ही ही कार घ्यायल हवी. या कंपनीने कारची रेंज 200 किमी पर्यंत असल्याचा दावा केलाय, पण जर रस्त्यावरील रेंजचा विचार केला तर ती 100 ते 120 किमी सहज जाऊ शकते. कमी वेगाने चालवली तर ही कार 150 ते 160 किमी पार करू शकते.
इतर काही खास फिचर्स:
▪️ तीन तासांत फुल चार्ज होणार
▪️ Strom R3 मध्ये 4जी कनेक्टेड डायग्नोस्टिक इंजिन
▪️ चालकाला लोकेशन ट्रॅक, चार्ज स्टेटसची माहिती होणार
▪️ या कारचा वेग 80 किमी प्रति तास आहे.
▪️ कार चालविण्यासाठी केवळ 40 पैसे प्रति किमी खर्च
▪️ मेन्टनन्सही अन्य कारपेक्षा 80 टक्के कमी असल्याचा कंपनीचा दावा
▪️ मागे साहित्य ठेवण्यासाठी चांगली जागा
▪️कंपनीने या कारवर 1 लाख किमी किंवा 3 वर्षांची वॉरंटी दिली आहे.
राज्यातील स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या या स्टार्टअप कंपनीने जगातील सर्वात स्वस्त ही इलेक्ट्रीक कार असल्याचा दावा केला आहे. सध्या कंपनीने प्री बुकिंग सुरु केले आहे. देशात सुरुवातीला ही कार दिल्ली एनसीआर, मुंबई उपनगरांसाठी या दोन मोठ्या शहरांसाठी उपलब्ध केली उपलब्ध होणार आहे. त्यानंतर हळूहळू पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit