आजकाल सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर दररोज काही ना काही ट्रेंड सुरू असतात. अशातच ‘श्रीवल्ली’ या गाण्याच्या काही स्टेप्सचा ट्रेंड फेसबुक-इंस्टाग्रामवर सध्या सुरू आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास दोन महिने झाले आणि फक्त आता 2 महिन्यातच या ट्रेंडमध्ये आणखी भर पडली ‘पुष्पा-द राइझ’ चित्रपटातील साडीची!
‘पुष्पा: द राइझ’ (Pushpa -The Rise) हा साऊथ चित्रपट देशभरात रिलीज झाला आणि दमदार डायलॉग्स, चित्रपटातील गाणे, अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ अजूनही पाडली आहे. यातील एकाहून एक सरस गाण्यांवर म्हणजेच श्रीवल्ली (Srivalli Song Saree) आणि सामी-सामी (Saami Song Saree) या गाण्यांवर तर अनेक दिग्गजांनी नृत्य करत इंस्टाग्राम रिल्स बनवले.
दरम्यान पुष्पा या चित्रपटातील कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या छायाचित्राची साडी (Pushpa Movie Sarees) बाजारात आलीय. एकेक साडी पाहीली की तुम्हीही अक्षरश: आपल्या तोंडालाच हात लावाल. आता श्रीवल्ली आणि पुष्पाची साडी देशभर लोकप्रिय होतेय. ‘पुष्पा’ची भूमिका साकारणाऱ्या स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Stylish Star Allu Arjun) सारखी हुबेहूब डॉयलॉग्सची अनेक जणांनी कॉपीही केली.
आता सुरतमधून ‘हा’ नवीन ट्रेंड सुरू…
‘पुष्पा’ आणि ‘श्रीवल्ली’च्या अप्रतिम साड्या बाजारात आल्या, साडी बघताच महिला झाल्या अवाक!#Pushpa #PushpaSaree #Amazing_sarees_of_Pushpa_and_Srivalli pic.twitter.com/blBPaAk9Zq
— Salman Shaikh Gangapur Kar (@MiSalmanShaikh) February 15, 2022
Advertisement
सुरतच्या प्रसिद्ध कापड बाजारातील एका व्यापाऱ्याकडे ‘पुष्पा’च्या काही फोटोंचे साडीवर प्रिंट करून बनवलेल्या आकर्षक साड्या पाहायला मिळाल्या. ‘पुष्पा’चं पोस्टर प्रिंटसह साड्या विकत असल्याचं प्रथम दिसलं. लोकांमध्ये या साड्यांना खूप मागणी असल्याचा दावा केला जात आहे. ‘चरणजीत क्रिएशन’च्या नावाने साडीचा व्यवसाय करणाऱ्या चरणपाल सिंह यांनी ‘पुष्पा’ चित्रपटातील काही चित्रासह साडी तयार करून घेतली आहे.
त्यानंतर अनेक फॅशन डिझायनर्सही चित्रपटाचे काही सीन (Scene) साड्यावर प्रिंट करून साड्यांची विक्री करत आहेत. ट्विटरवर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे पोस्टर छापलेली साडी दिसत आहे. या गुजरातमधील सुरतमध्ये दाखवण्यात आलेल्या साड्या आहेत. चरणजीत क्रिएशन्स या स्थानिक दुकानात बनवलेली अनोखी साडी देशात चर्चेचा विषय झाली आहे.
पुष्पा चित्रपटातील काही पोस्टर वापरून साडीवर प्रिंट करण्याची चरणपाल सिंग यांनी कल्पना मांडली होती. अनेक नमुने शेअर केले होते जे आता व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील काही फोटो साड्यांवर प्रिंट करण्याचा ट्रेंड लगेच सुरू होण्यामागे हेच कारण आहे. पुष्पाच्या पोस्टरची साडी व्हायरल झाल्यावर काही वेळातच, प्रचंड ग्राहकांनी दुकानात गर्दी केली आणि या दुकानातील कापड व्यापाऱ्याला देशातून साड्यांची मागणी आली. राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडसह प्रमुख राज्यांतील लोक आता ‘पुष्पा’ साड्या ऑर्डर करत आहेत. काही दिवसांत तुमच्या आसपासच्या शहरांतही या साड्या उपलब्ध होऊ शकतात. आता या साड्यांची महिलांमध्ये मोठी मागणी वाढत चालली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit