SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका क्लिकवर एका मिनिटात एक लाखापर्यंत लोन.. ‘गुगल-पे’ वापरणाऱ्यांसाठी सुविधा सुरु..

अनेकदा पैशांची अडचण आल्यास बॅंकांचे दार ठोठावण्याची वेळ येते. मात्र, लोन घेण्यासाठी कागदपत्रांची जंत्री सादर करताना, जीव मेटाकुटीला येतो.. अशा वेळी तुम्हाला आता एका क्लिकवर काही मिनिटांत लोन मिळू शकेल.. तेही 1 लाखांपर्यंत..!

गुगल पे (Google Pay)तर्फे पर्सनल लोनची सुविधा सुरु करण्यात आलीय. त्यासाठी डीएमआय फायनान्स लिमिटेड (DMI Finance Limited) ‘गुगल पे’च्या माध्यमातून ‘डिजिटल पर्सनल लोन’ (Digital Personal Loan) ऑफर करीत आहे. ‘गुगल पे’चा वापर करणाऱ्यांना हे लोन घेता येईल. अर्थात, सरसकट नाही.. ‘गुगल पे’ वापरणाऱ्यांची ‘क्रेडिट हिस्ट्री’ क्लिअर असेल, तरच केवळ एका मिनिटात हे लोन मिळू शकतं.

Advertisement

‘डीएमआय फायनॅन्स सर्व्हिसेस’द्वारे घालण्यात आलेल्या अटीनुसार ‘प्री क्वालिफाईड एलिजिबल युझर्स’ ठरवले जातील नि त्यांनाच ‘गुगल पे’च्या माध्यमातून लोन दिलं जाईल. तुम्ही जर ‘प्री अप्रुव्ह्ड कस्टमर’ असाल, तर तुम्हाला तात्काळ लोन प्रोसेस केलं जाईल नि तुमच्या बँक अकाऊंटमध्ये लोनचे पैसे लगेच जमा होतील.

‘गुगल पे’ वापरणाऱ्यांना ‘डबल’ फायदा होणार आहे. ‘गुगल-पे’चा ‘कस्टमर एक्सपिरिअन्स’ मिळेल. सोबतच ‘डीएमआय फायनॅन्स सर्व्हिसेस’द्वारे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत ‘पर्सनल लोन’ही देण्यात येईल. हे लोन फेडण्यासाठी तुम्हाला 36 महिने, अर्थात 3 वर्षांचा कालावधी मिळेल. सध्या ‘इन्स्टन्ट लोन’ची सुविधा 15 हजारांहून अधिक पिन कोडसाठी सुरू केली जात आहे.

Advertisement

लोन कसे घ्यायचे..?
– सर्वप्रथम मोबाइलवर ‘गुगल पे’ सुरु करा.
– प्री अप्रुव्ह लोनसाठी (Pre Approved) तुम्ही पात्र असल्यास प्रमोशनच्या खाली मनी (Money) हे ऑप्शन दिसेल. तेथे ‘Loan’ ऑप्शनवर क्लिक करा.
– आता Offers चा ऑप्शन खुला होईल. त्यात DMI ऑप्शन दिसेल. त्यामध्ये कोणी कमीतकमी किती रक्कम नि सर्वाधिक किती रकमेचं लोन घेऊ शकेल, हे दिसेल. सोबतच अन्य डिटेल्सही दिसतील.
– नंतर Application प्रोसेस पूर्ण करा. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर Loan Approve झाल्यावर तुमच्या बँक खात्यात ती रक्कम येईल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement