SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान निधीचा लाभ ‘अशा’ शेतकऱ्यांना मिळणार नाही, फसवणूकाचा गुन्हा, जेलची हवा खावी लागेल..!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा लाभ अनेक अपात्र शेतकरी घेत असल्याचे समोर आले आहे..

देशभरात असे अनेक शेतकरी आहेत, जे पीएम किसान योजनेत सामील झाले आहेत, मात्र ते या योजनेच्या अटी व नियम पूर्ण करत नाहीत. मात्र, तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, अशा अपात्र शेतकऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार आता पूर्ण रक्कम वसूल करणार आहे.

Advertisement

नियम काय..?
घरातील एकाच जमिनीवर कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, तर तुम्हाला हप्त्याचे 2000 रुपये परत करावे लागतील. समजा, एका कुटुंबातील एकाच जमिनीवर आई, वडील, पत्नी आणि मुलाला पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत असल्यास त्यांना सरकारला पैसे परत करावे लागणार आहेत.

पीएम किसान योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकतो. एकाच जमिनीवर एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रसंगी अशा प्रकरणात जेलवारीही करावी लागू शकते..

Advertisement

सरकारने या योजनेच्या काही नियमांत बदल केले आहेत. आता ज्यांच्या नावावर शेती असेल, त्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे यापुढे वडिलोपार्जित जमिनीत वाटा असलेल्या एकाच घरातील अनेकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कोणाला लाभ मिळणार नाही..?
– शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने टॅक्स भरला असेल, तर त्याला योजनेचा लाभ मिळत नाही.
– शेतीयोग्य जमीन नसणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळले आहे.
– आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल, तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
– एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल, तर त्यालाही पीएम किसानचा लाभ मिळत नाही.
– रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेबाहेर ठेवले आहे.
– एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल, तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Advertisement

 

Advertisement