SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): काही लोकं घराच्या सजावटीसाठी व्यवस्था करताना दिसून येतील. सकारात्मक व उत्साही विचार राहतील. सहकाऱ्यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील. आज मोकळा श्वास घ्यायला देखील वेळ मिळणार नाही.

वृषभ (Taurus): आज तुम्ही जोडीदारासोबत आठवड्याच्या शेवटी बाहेर फिरायला जाऊ शकता. नोकरीत नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकुलतेतून मार्ग काढता येईल. कामाच्या ठिकाणी ग्राहक आणि वरिष्ठांशी पूर्णपणे गुंतलेले असतील.

Advertisement

मिथुन (Gemini) : कौटुंबिक जीवनात सामान्य फलप्राप्ती होईल. गुरूंचे सहकार्य घेताना दिसून येतील. काहींना भेटवस्तू मिळतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील, प्रवासात फायदा होईल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. तुमच्या शरीरात चपळता असेल.

Advertisement

कर्क (Cancer) : विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. समाजातील एका महान व्यक्तीशी तुमची गाठ-भेट होऊ शकते. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलता आले तर बरे. आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. प्रेमी जीवनाला बहर येईल.

सिंह (Leo) : सिंह राशीचे लोकं मुलांना अभ्यासात मदत करताना दिसून येतील. घरात गैरसमज होतील. नोकरीत कामाचा ताण राहील. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. शांततेने इतरांची मते जाणून घ्या.

Advertisement

कन्या (Virgo) : मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी आज योग-ध्यान केले पाहिजे. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिक लाभ होईल. व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. आरोग्याच्या दृष्टीने तुमचे आरोग्य चांगले राहील.

Advertisement

तुळ (Libra) : सामाजिक स्तरावर धार्मिक कामांमध्ये सहभाग घ्याल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे. खेळात भाग घेऊन तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. विरोधकांना पुरून उराल. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे.

वृश्‍चिक (Scorpio) : उच्च शिक्षण घेत असताना मोठी संधी मिळू शकते. मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी नको. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

Advertisement

धनु (Sagittarius) : पोटाशी सबंधित तक्रार होऊ शकते म्हणून खाण्या-पिण्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील. तुमच्या घरातील कोणतेही शुभ कार्य पूर्ण होईल. बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या नात्यात गोडवा राहील.

Advertisement

मकर (Capricorn) : आज भावनांचा अतिरेक होण्यापासून लांब रहा. कार्यालयातील राजकारणापासून लांब राहणे चांगले असेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. वागण्याचा फार विचार करू नका. नोकरीत अनुकूल परिस्थिती असेल. जुन्या लोकांच्या भेटीगाठी होतील, त्यांच्यासमवेत वेळ जाईल.

कुंभ (Aquarious) : सामाजिक स्तरावर प्रतिष्ठेत वाढ होईल. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर लाभ होऊ शकतो. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. विनाकारण कोणाशी तरी वाद होईल.

Advertisement

मीन (Pisces) : वैवाहिक लोकांना जीवनसाथीदाराचे सहकार्य मिळेल. मनस्तापपण होणार नाही. आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. हुशारी दाखवून तुमची कामे सहज पूर्ण कराल.

Advertisement