पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असलेल्या तोरणा गडावर चढताना (Torna Fort) एका 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. वेल्हे पोलीस ठाण्यात (Velhe Police Station) तशी मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर अधिक माहीती समोर आली आहे.
तुम्हीही गडाची सफर करायला जात असाल तर वाचा ही घटना..
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम महेशकुमार भरमगुंडे (वय-21) असे त्या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि.13) तोरणा गड चढण्यासाठी 6 जणांचा ग्रुप आला होता आणि त्यांनी चढाई सुरू केली होती. त्या 6 जणांच्या ग्रूपमध्ये ओम संगावार, मोहित काळे, पूनम कोल्हे, रोहन जाधव, हर्षल वाळके आणि ओम भरमगुंडे अशा सहा जणांचा समावेश होता.
त्यानंतर हे 6 जण ग्रूपमध्ये चालत असताना काही अंतरावर गेल्यानंतर ओम हा एकटा इतर 5 जणांपासून जास्त पुढे निघून गेला. त्याचे सर्व मित्र त्याच्यापासून काही अंतरावर होते. मग गड चढत असताना वाटेत अचानक एक दगड त्याच्यावर पडला आणि ओम जागेवरच कोसळला या घटनेत ओमच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याचं समोर आलं आहे. तो त्याच क्षणी खाली कोसळल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.
सदर घटनेत घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी त्वरित 108 रुग्णवाहिकेला फोन करुन लगेच बोलावले. रुग्णवाहिका किल्ल्याच्या अर्ध्या भागापर्यंत आली असताना अक्षय पाटील या पर्यटकाने ओमला स्वतःच्या पाठीवर चालत आणून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणलं. पण उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला तपासले असता मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit