SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधारक तरुणांना सरकारी नोकरीची संधी, रिझर्व्ह बॅंकेत 950 जागांसाठी भरती..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) बंपर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ‘आरबीआय’मधील ‘सहाय्यक’ पदासाठी ही भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

रिझर्व्ह बॅंकेतील सहायक पदासाठी होणाऱ्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे, अर्ज कसा करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

या पदासाठी भरती – आरबीआय साहाय्यक (RBI Assistant)

एकूण जागा – 950

Advertisement

शैक्षणिक पात्रता व अनुभव
– इच्छूक उमेदवारांनी 50 टक्के गुणांसह पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले असावे.
– मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून, महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालेलं असावं.
– उमेदवारांना कम्प्युटर आणि ‘एमएस-ऑफिस’चे (MS-Office) संपूर्ण ज्ञान असावं.
– उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केलेल्या असाव्यात.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावं (राखीव प्रवर्गाताल उमेदवारांना सूट)

Advertisement

निवड प्रक्रिया
सहाय्यक पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची सुरुवातीला पूर्व व मुख्य लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची ‘Language Proficiency Test’ घेण्यात येईल. नंतर डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.

भरती शुल्क
जनरल /ओबीसी / ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 450/- रुपये
राखी प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 50/- रुपये

Advertisement

आवश्यक कागदपत्रं
बायोडेटा
– दहावी, बारावी व पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट फोटो

कधीपासून अर्ज करायचा? – 17 फेब्रुवारी 2022 

Advertisement

अर्ज करण्याची अंतिम मुदत – 08 मार्च 2022

येथे करा अर्ज – https://opportunities.rbi.org.in/

Advertisement

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा – https://drive.google.com/file/d/1pobUBhHgAGdPnzeUuiBd4JlmZ6-lQuX9/view

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement