SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मराठा आरक्षणाबाबत महत्वाची बातमी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून मोठी घोषणा..!

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी येत्या 26 फेब्रुवारीपासून आपण मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की “गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी हे आंदोलन करतोय.. मी एकटा आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचे 5 मुद्दे मान्य करावेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी हे आंदोलन करीत आहे.”

Advertisement

“सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा समाजाचे आरक्षण (Maratha reservation) रद्द केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास आपण आव्हान देऊ शकत नाही. जस्टीस गायकवाड यांचा अहवाल अवैध ठरल्याने मराठा आरक्षणाचा कायदा मोडीत निघाला. आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. मराठा समाजाचा सामाजिक मागासलेपणा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, पण गेल्या 8 महिन्यांपासून सरकार समिती स्थापन करण्यावर काहीही बोलत नाही..”

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणासाठी अनेकदा आक्रमक आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला, मात्र आता उद्विग्न झालोय. माझा कोणत्याही पक्षातील नेत्यांना विरोध नाही. मी मराठा समाजाचे नेतृत्व करण्यासाठी आलेलो नाही, तर त्यांचा शिपाई म्हणून उपस्थित असल्याचे ते म्हणाले..

Advertisement

ते म्हणाले, की “छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापन केली. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना 50 टक्के आरक्षण दिले. मी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढतोय. मराठा समाज व 12 बलुतेदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे.”

सरकारकडून काहीच हालचाल नाही
“मराठा समाजही वंचित घटक आहे. त्यामुळे या समाजासाठी आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे, म्हणून मराठा आरक्षणासाठी लढत नाही, पण इतक्या वेळा आंदोलन करूनही मागणी पूर्ण झालेली नाही. मला टोकाची भूमिका घेऊ नका, असे सांगितले, पण सरकार काहीच हालचाल करीत नसल्याने मुंबईतील आझाद मैदानात 26 फेब्रुवारीला बेमुदत उपोषण करणार आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले..

Advertisement

🎯 _*तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा*_ 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement