SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): कामाच्या ठिकाणी अतिघाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. महत्वाकांक्षी स्वभावासाठी आजचा दिवस शुभ राहील. प्रवासात पहिला दिवस लाभदायक राहील. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम कराल.

वृषभ (Taurus): व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना अमलात आणाल. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद झाल्यास कायदेशीर बाजू नवे वळण घेऊ शकते. संध्याकाळच्या नियोजनात फायदा होईल. सहकाऱ्यांची मने जिंकून घ्याल. आजचा दिवस मनाजोगा जाईल.

मिथुन (Gemini) : आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. अचानक पाहुणे आल्याने खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. दानधर्म कराल. भावंडांशी संबंध सुधारतील.कर्क (Cancer) : उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भौतिक साधनांवर खर्च होण्याचे योग आहेत. एखाद्या मित्राशी वैर होईल. नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून सावध राहावे. जनसंपर्कात वाढ होईल.

सिंह (Leo) : काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा. गुरूची स्थिती शुभ आहे. लाभदायक ग्रह अष्टमात स्थित आहेत. मनातील कडवटपणा दूर होईल. खरेदीसाठी बाजारात जाण्यापूर्वी योग्य यादी तयार करणे चांगले राहील.

कन्या (Virgo) : काही नवीन मार्ग सापडतील. मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. कौटुंबिक सहकार्यही मिळेल, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारच्या खोट्या प्रशंसेपासून दूर राहावे.

Advertisement


तुळ (Libra) : आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत. अति विचारात वेळ वाया घालवू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे.

वृश्‍चिक (Scorpio) : वादाचे प्रसंग टाळावेत. आनंदाची अनुभूति मिळेल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो. नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित बढतीही मिळू शकते. शुभ खर्चही होऊ शकतो, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल.

धनु (Sagittarius) : अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शेजाऱ्यांना मदत कराल. बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. वातावरण सकारात्मक राहील. नात्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

Advertisementमकर (Capricorn) : कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. रात्रीचा वेळ पिकनिक आणि मौजमजेत घालवला जाईल. तुमच्या जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. बिझनेस ट्रिपवर जाणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

कुंभ (Aquarious) : प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांशी जवळीक वाढेल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात जाईल. जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल.

मीन (Pisces) : तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. आज मालमत्तेशी संबंधित वादात नुकसान होऊ शकते. भौतिक सुखाची साधने वाढतील. तुम्ही तुमचा मुद्दा लोकांसमोर ठामपणे मांडू शकाल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. आळशीपणा झटकून लवकरात लवकर कृती करणे गरजेचे आहे.

Advertisement