SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहावी-बारावीची लेखी परीक्षा नको, विद्यार्थ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल..!

मागील काही दिवसांत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवरुन मोठा गोंधळ सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार, परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना हाॅल तिकिटही देण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, कोरोनामुळे गेले वर्षभर विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांचे तोंडही पाहिलेले नाही. सगळा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धताने शिकवण्यात आला. विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नसून, त्यांना लिहिण्याचाही सराव राहिलेला नाही.

Advertisement

अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवला, नेतेमंडळींच्या बैठका ऑनलाईन पद्धतीनेच होतात, तर परीक्षा ऑफलाईन का, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी ‘हिंदुस्थानी भाऊ’ने केलेल्या आवाहनानुसार, राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतरही राज्य सरकार ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यावर ठाम आहे.

सर्वोच्च न्यायालयात याचिका
राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध विद्यार्थ्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजा ठोठावला आहे.. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या लेखी परीक्षांऐवजी पर्यायी मूल्यमापन पद्धतीने गुण देण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Advertisement

‘इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशन’च्या अध्यक्षा अॅड. अनुभा सहाय यांच्यामार्फत महाराष्ट्रासह 15 राज्यांतील विद्यार्थी आणि ‘ओडिशा स्टुडंट युनियन’ने ही रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. बहुतेक पालकांनी कोरोना संसर्गात पाल्याला शाळेत पाठविण्यास संमतीपत्र दिलेले नाही, असे अॅड. प्रशांत पद्मनाभन यांनी रिट याचिकेत म्हटले आहे.

Advertisement

दहावी-बारावीच्या परीक्षेचा वाद सर्वाेच्च न्यायालयात गेल्याने आता या परीक्षा होणार का, राज्य सरकार काय निर्णय घेणार, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे..

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement