SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आयपीएल’ खेळाडूंच्या हातात प्रत्यक्ष किती पैसे मिळतात..? विदेशी खेळाडूंना ‘टॅक्स’ द्यावा लागतो का..?

‘आयपीएल-2022’च्या हंगामासाठी बंगळुरु येथे सुरु असलेल्या ‘मेगा ऑक्शन’मध्ये संघ मालकांकडून खेळाडूंवर कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू आहेत. स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी संघ मालकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. बहुतांश खेळाडूंना 5 कोटींहून अधिक रकमेची बोली लागली.

खेळाडूंवर लागणारी कोट्यवधी रुपयांची बोली पाहून सर्वसामान्य माणूस अचंबित होत आहे.. मात्र, खेळाडूंच्या हातात प्रत्यक्षात किती रक्कम पडते, या रकमेवर काही कर भरावा लागतो का, विदेशी खेळाडूंना ‘इन हॅंड’ किती पैसे मिळतात, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

भारतीय खेळाडूंना किती पैसै.?
‘मेगा ऑक्शन’मध्ये खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागत असली, तरी प्रत्यक्षात खेळाडूंच्या हातात सगळीच रक्कम पडत नाही. अन्य नागरिकांप्रमाणेच खेळाडूंना ‘टॅक्स’ द्यावा लागतो. बोलीत मिळणाऱ्या रकमेतून 10 टक्के ‘टीडीएस’ कापला जातो..

नंतर खेळाडूंना ‘आयटीआर’ दाखल करावा लागतो. त्यात खेळाडूंचे इतर उत्पन्न नि खर्चाचा हिशेब द्यावा लागतो.. खेळाडूंना निव्वळ उत्पन्नाच्या आधारावर कर द्यावा लागतो. ‘टीडीएस’ची गणना केवळ बोलीतील रकमेच्या आधारावरच केली जाते.

Advertisement

‘कर कपात होऊन खेळाडूंच्या हातात नेमका किती पैसा मिळतो, याचा प्रत्यक्ष अंदाज लावणे कठीण आहे. बोलीत जाहीर केली जाणारी रक्कम ‘बेस प्राईस’ असते. खेळाडूंचे कंपनीसोबत विविध करार असतात. त्यानुसार, त्यांना पैसे मिळतात. खेळाडूला ‘प्लेईंग- 11’मध्ये संधी न मिळाल्यास त्याला वेगळे पैसे मिळतात. खेळाडूंच्या करारावरच या रकमेचे स्वरुप ठरते, असे सनदी लेखापाल सौरभ शर्मा यांनी सांगितले.

विदेशी खेळाडूंचे काय?
भारतीय खेळाडूंप्रमाणेच विदेशी खेळाडूंनाही भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावर 20 टक्के ‘टीडीएस’ द्यावा लागतो. मात्र, त्या व्यतिरिक्त अन्य कोणताही कर या विदेशी खेळाडूंना भरावा लागत नाही. भारतात मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांना कर द्यावा लागतो. त्यांना ‘आयटीआर’ दाखल करण्याची गरज नसते, असे सांगण्यात आले..

Advertisement

 

Advertisement