SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मित्राच्या कर्जासाठी जामीनदार होऊन फसलात..! मग ‘अशी’ करुन घ्या सुटका..!

आर्थिक अडचण आली, की एकच मार्ग समोर दिसतो, तो बॅंकेचा..! कर्जरुपाने बॅंका मदतीला धावतात. अर्थात कर्ज देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा सगळा तपशील बॅंका तपासतात. सीबील स्कोअर, त्या व्यक्तीचे इनकम, आधी काही कर्ज घेतलंय का नियमित ‘आयटीआर’ भरतो का, आदी बाबी पाहिल्या जातात नि मगच कर्ज मंजूर केले जाते.

बॅंकांकडून या सगळ्या गोष्टी तपासण्याबरोबरच एक महत्वाची मागणी केली जाते. ते म्हणजे, जामीनदाराची..! कर्ज घेणाऱ्याने त्याची परतफेड न केल्यास, त्याच्या कर्जाची हमी देणारी व्यक्ती म्हणजे जामीनदार..! प्राथमिक कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्यास, जामीनदारास जबाबदार धरले जाते..

Advertisement

नाहक झंझट मागे नको, म्हणून अनेक जण सध्या जामीनदार होण्यास नकार देतात. मात्र, बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठी इच्छा नसतानाही जामीनदार व्हावे लागते.. नंतर त्या जवळच्या व्यक्तीने कर्ज न फेडल्यास तुम्हाला नाहक बॅंकेच्या पायऱ्या झिजवण्याची वेळही आली असेल..!

नातेवाईकांसाठी किंवा मित्रासाठी जामीनदार (गॅरंटर) राहिल्यास नि त्या व्यक्तीने कर्ज न भरल्यास बँक तुमच्याकडे कर्जाबाबत विचारणा करू शकते. मात्र, अशा वेळी घाबरून न जाता, बँकेत जाऊन तुम्ही जामीनदाराचे ओझे खांद्यावरुन उतरु शकता. त्यासाठी नेमकं काय करावे लागेल, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

बँकेकडे रितसर अर्ज
मित्र किंवा नातेवाईक कर्ज भरण्यास टाळाटाळ करीत असल्यास बॅंक जामीनदाराला जबाबदार धरते. अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन ‘आपण संबंधित व्यक्तीला जामीनदार राहू इच्छित नाही..’ असा रितसर अर्ज करू शकता. अशा वेळी बॅंकेकडून कर्जदाराला दुसरा व्यक्ती जामीनदार म्हणून शोधण्याचा सल्ला दिला जातो. तुमची त्यातून सुटका होऊ शकते..

नोकरी गमावल्यास..
तुम्ही तुमची नोकरी गमावली असल्यास बँकेकडे जामीनदार म्हणून न राहण्याबाबत अर्ज करू शकता. नोकरी गेल्याचा एखादा पुरावा व जामीनदार न राहण्याबाबत अर्ज संबंधित बँकेकडे सादर केल्यावर तुमची जामीनदार म्हणून सुटका होते.

Advertisement

परदेशात नोकरी लागल्यास
परदेशात नोकरी मिळाली असेल, तरी तुमची जामीनदारमधून सुटका होते. परदेशात नोकरी लागल्याची माहिती संबंधित बँकेला द्या. तुमच्या नोकरीसंदर्भातील कागदपत्रे बँकेत सादर करा नि गॅरंटरमधून तुमचे नाव काढून टाकण्याची विनंती बँकेला करा. त्यानंतर बँक तुमची गॅरंटरमधून मुक्तता करते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement