SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त एका रुपयात मिळवा दोन लाखांपर्यंत लाभ, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..!

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कधी काय होईल सांगता येत नाही.. कोणाच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा वेळी प्रत्येक जण आपले व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. त्यासाठी विविध ठिकाणी गुंतवणूक करणे, विमा पाॅलिसी काढण्यात येतात..

नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारनेही विविध योजना सुरु केल्या आहेत. मात्र, अनेकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे अशा योजनांच्या लाभापासून हे नागरिक वंचित राहतात. केंद्र सरकारने 2015 मध्ये 3 सामाजिक सुरक्षा योजनांची घोषणा केली होती. पैकी एक योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (PMSVY)…!

Advertisement

केंद्र सरकारकडून चालवली जाणारी ही एक ‘अ‍ॅक्सिडेंटल पॉलिसी’ (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) आहे. या विमा पॉलिसी अंतर्गत प्रीमियम रक्कम भरल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास, त्याला दिव्यांगत्व आल्यास आर्थिक संरक्षण दिले जाते. ही विमा योजना दरवर्षी रिन्यू करता येते. आपण या योजनेसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकतो.

योजनेची वैशिष्ट्ये
– ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चा लाभ घेण्यासाठी वर्षाला फक्त 12 रुपये, म्हणजेच महिन्याला तुम्हाला फक्त 1 रुपया गुंतवावा लागणार आहे.
– विमा योजनेत गुंतवणूक केल्यास, पॉलिसीधारकाला 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळते.
– अपघात झाल्यास कुटुंबाला किंवा पॉलिसीधारकाला 2 लाख रुपयांची मदत रक्कम मिळते.
– अपघातात विमाधारक अपंग झाल्यास, त्याला 1 लाख रुपयांची मदत मिळते.
– विमा पॉलिसीचा लाभ 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी आहे.

Advertisement

योजनेसाठी अटी..
– ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चा लाभ घेण्यासाठी 17 ते 70 वर्षे या दरम्यान वय असावे.
– तसेच बँकेत बचत खाते असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज..
– ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चा लाभ घेण्यासाठी जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता. बॅंकेत जाऊन या योजनेची माहिती घेऊन अर्ज सबमिट करता येतो..
– खातेधारकाला संबंधित बॅंकेच्या वेबसाईटवरुनही अर्ज करता येतो. त्यासाठी वेबसाईटवर ‘लॉग इन’ करुन विचारलेली आवश्यक माहिती भरावी.. योजनेनुसार दरवर्षी 25 ते 31 मे दरम्यान 12 रुपये कापले जातात.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement