SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विधवा महिलांना मिळणार आता ‘एवढे’ रुपये, सरकारच्या योजनेबद्दल सविस्तर वाचा..

देशातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक राज्यांमध्ये अनेक योजना राबवल्या जातात. त्यानुसार लोक लाभ घेत असतात. लोकांना खास सुविधा दिल्या जातात. याप्रकारेच विधवा पेन्शन योजनाही सरकार चालवत आहे. अनेकांना याची माहिती नसेल, तर तुमच्या आसपास तलाठी, ग्रामपंचायत, तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. कोणी विधवा महिला असेल, ते त्यांना या योजनेविषयी नक्की माहीती द्या.

पेन्शन कोणाला मिळणार?

Advertisement

👉 विधवा महिलांना प्रति महिन्याला पैसे मिळणार आहेत. सरकारच्या या योजनाअंतर्गत राज्यानुसार पैसे दिले जातात.
👉 सरकारच्या विधवा पेन्शन योजनेत आर्थिक बिकट परिस्थिती असलेल्या महिलांनाच मदत केली जाते.
👉 महिलांना प्रत्येक महिन्याला विधवा पेंन्शन योजनेची रक्कम दिली जाते.
👉 फायदा फक्त दारिद्र रेषेखालील विधवा महिलांना मिळणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही महिलांना सरकारकडून हे अनुदान दिले जाणार नाही आहे.
👉 अर्ज करणाऱ्या विधवा महिलेचे वय 18-60 वर्षे दरम्यान असावे

देशातील विविध राज्यांमध्ये वेगळी पेन्शन

Advertisement

▪️ महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेत दरमहा 900 रुपये दिले जातात.
▪️ दिल्ली विधवा पेन्शन योजनेत 2500 रुपये प्रति 3 महिन्याला मिळतात.
▪️ राजस्थान विधवा पेन्शन योजनेत 750 रुपये प्रति महिना दिला जातो.
▪️ उत्तराखंड विधवा निवृत्ती वेतन योजनेत 1200 रुपये प्रति महिना मिळतात.
▪️ गुजरात विधवा पेन्शन योजने अंतर्गत दरमहा 1250 रुपये दिले जातात.
▪️ हरियाणा सरकार ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे, अशा विधवा महिलांनाच प्रत्येक महिन्यास 2250 रुपये पेन्शन देते.
▪️ उत्तर प्रदेश सरकारच्या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दरमहा 300 रुपये देते. या योजनेत निवृत्ती वेतनाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते.

कागदपत्रे कोणते लागतील?

Advertisement

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी, तुम्हाला तुमचे रहिवासी पुरावा, बँक खाते पासबुक, आधार कार्ड, पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांकासह पासपोर्ट साईझ फोटो गरजेचा असेल.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा

Advertisement