SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): शारीरिक दृष्ट्‍या सक्षम राहाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळचा प्रवास घडेल. दिवसाच्या शेवटी आनंदादायी घटना घडेल. योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचण्याचं तुमचं स्वप्न लवकरच सत्यात उतरेल.

वृषभ (Taurus): शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना दिवस लाभदायक असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. थोरांचे आशीर्वाद घेता येतील. मुलाखतीची तयारी करा. काही प्रश्न तुम्हाला आश्चर्यचकित करतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : कोणतीही चर्चा जास्त वेळ ताणू नका. नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. तुमच्या मनाची एकाग्रता कायम राहिल. आज तुम्हाला सामाजिक कारणांसाठी योगदान देण्याची इच्छा होईल. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. आरोग्यकडं लक्ष द्या.

कर्क (Cancer) : नवीन योजनांवर अंमल करू शकाल. अचानक मूड बदलू शकेल. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊ नका. वेळेचं व्यवस्थापन कौशल्य सुधारल्यानं तुमचं तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुमच्याशी स्पर्धा करणाऱ्यांपासून सावध राहावं. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल.

Advertisement

सिंह (Leo) : नवीन पुस्तक खरेदी करू शकता. सत्य बोलण्याची तुमची वेळ आहे. तुमचा प्रवास अपेक्षेपेक्षा अधिक अध्यात्मिक होईल. कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. नवीन गोष्टीत रस घ्याल. तुमच्या जवळच्या मित्रा फसगत झाल्यासारखं वाटेल त्याच्याशी बोला. मनातील प्रेमभावना व्यक्त करता येईल.

कन्या (Virgo) : उत्साहाने व जोमाने कामे तडीस न्याल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. उत्तम श्रोता होण्यासाठी तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे. वायफळ खर्च टाळा. जोडीदारासोबत मन मोकळ्या गप्पा होतील. संध्याकाळ सुखद असेल.

Advertisement

तुळ (Libra) : पराक्रमात वाढ होईल. एखाद्या व्यक्तीसोबत मोठा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळा. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला उत्तम पाठिंबा मिळतो आहे. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. भावंडांना मदत कराल. अति उत्साहात नसते उद्योग करू नका. आरोग्याबाबत काळजी घ्या.

वृश्‍चिक (Scorpio) : पूर्वी शिकलेल्या गोष्टीतून लाभ मिळू शकेल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. लवकरच एखाद्या व्यक्तीशी जोडले जाल आणि अनेक ठिकाणी प्रवासाचा योग येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. तज्ञ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. मनासारख्या गोष्टी करा.

Advertisement

धनु (Sagittarius) : धार्मिक कामात मदत नोंदवाल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. वैचारिक कारणांमुळे एखाद्या निश्चित निर्णयावर तुम्ही पोहोचू शकणार नाहीत. इतरांना मदत केल्याचा आनंद मिळेल. नव्या अनुभवाचा आनंद लुटा.
सहकाऱ्यांशी असणारे संबंध सुधारतील.

मकर (Capricorn) : आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर काही आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या योगदानाचं श्रेय तुम्हाला मिळेल. पूर्वी घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागू शकतो.

Advertisement

कुंभ (Aquarious) : अन्यथा वादाचे प्रसंग उद्भवू शकता. वायफळ खर्च सुद्धा होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. काही तास तुम्हाला अनेक गोष्टींकडं लक्ष द्यावं लागेल. दिवसभरातील कामं लवकर उरकून एखादं चांगलं पुस्तक वाचावं असा हा दिवस आहे.

मीन (Pisces) : उत्कृष्ट कल्पनाशक्ती लाभेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. भाऊ किंवा बहिणीमुळे दिवस लकी ठरेल. व्यापाऱ्यात लाभ होईल. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. आर्थिक प्रश्न सुटेल. संध्याकाळी शक्यतो विश्रांती घ्या.

Advertisement