SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्याच्या बँक खात्यावर आले 15 लाख रुपये, जर तुम्हीही वाट बघत असाल, तर वाचा..

देशातील सरकार आपल्या बँक खात्यावर 15 लाख रुपये पाठवणार असल्याचं तुम्ही ऐकलंच असेल. पण ते येणार की नाही ते अजूनही कोणाला माहीत नाही. पण तुम्हाला माहीती आहे का? महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यात एक अशी घटना घडली आहे की, तेथील शेतकऱ्याच्या नावावर तब्बल 15 लाख रुपये आल्याचं समजतंय.

शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख रुपये आले कुठून?

औरंगाबाद जिल्ह्यातील बँकेचे काही अधिकारी आता एका शेतकऱ्याकडे 15 लाख रुपये परत मागितल्याची घटना घडली आहे. ते परत करण्याची विनंती करून शेतकऱ्याच्या खात्यावर 15 लाख चुकून पाठवले गेले असल्याचं त्या बँक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. आता या शेतकऱ्याने पैसे खर्च केल्याचं बँक अधिकाऱ्यांना सांगितलंय.

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहणाऱ्या ज्ञानेश्वर ओटे (Dnyaneshwar Ote) यांच्या घरात आनंदाचं वातावरण झालं, जेव्हा 15 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात आले. पण ज्ञानेश्वर ओटे यांना वाटलं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minsiter Narendra Modi ) आपलं निवडणुकीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी लोकांच्या खात्यात पैसे पाठवत आहे. म्हणून आपल्या हक्काचे पैसे जसे कोणीही खर्च करतं तसेच त्यातील काही पैसे त्यांनीही खर्च केले. याशिवाय विशेष म्हणजे त्याने पंतप्रधान मोदींना ‘धन्यवाद’ देणारं पत्रही लिहिलं आहे.

ज्ञानेश्वरने पैशांचं काय केलं?

ज्ञानेश्वर यांनी घर बांधण्यासाठी आपल्या बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Baroda) खात्यातून 9 लाख रुपये काढले. मात्र 6 महिन्यातच शेतकऱ्याचं स्वप्न तुटलं. बँकेने त्याला नोटीस पाठवल्यानंतर शेतकऱ्याला धक्काच बसला. ही रक्कम चुकून शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर बँकेने ज्ञानेश्वर यांना नोटीस पाठवली असून “एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकून तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. त्यामुळेच आता तुम्ही हे पैसे बँकेला परत करावेत”, असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पैसे विकासासाठी पिपळवंडी ग्रामपंचायतीमधील विकासकामांसाठी ग्रामपंचायतीच्या खात्यात ट्रान्सफर करावयाचे होते. मात्र चुकून हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात गेल्याची माहीती समोर आली आहे. मग चार महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला विकासकामांसाठीचा पैसा हा ज्ञानेश्वर यांच्या खात्यावर जमा झाल्याचं कळलं. ज्यानंतर बँकेने नोटीस पाठवली आणि बँकेने हे चुकून झाल्याचं सांगितल्यावर त्या 15 लाख रुपयांपैकी 6 लाख रुपये ज्ञानेश्वर यांनी बँकेला परत केलेत. मात्र त्यांनी याच पैशांमधून 9 लाख खर्च करुन घर बांधलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा https://jio.sh/spreadit

Advertisement