SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ईशान किशन ठरला सर्वात महागडा खेळाडू, दीपक चहरला ‘लाॅटरी’, दिग्गज ‘अनसोल्ड’..!

बंगळुरु येथे होत असलेल्या ‘आयपीएल-2022’साठीच्या मेगा ऑक्शनमध्ये इशान किशन आज (ता. 12) सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सने तब्बल 15.25 कोटी रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात कायम राखलं.. युवराज सिंग याच्यानंतर (16 कोटी- 2015) आता किशन हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.

किशन याच्यानंतर अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 14 कोटी रुपये मोजलेे. आजच्या दिवसातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयस अय्यर याला कोलकत्ताने तब्बल 12.25 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात घेतलं..

Advertisement

विशेष म्हणजे, अनेक दिग्गज खेळाडूंवर आज बोली न लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यात सुरेश रैना याच्यासह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन यांच्यासह अनेकांचा समावेश आहे..

या खेळाडूंवर लागली बोली
इशान किशन – 15.25 कोटी (मुंबई)
दीपक चहर – 14 कोटी (चेन्नई)
श्रेयस अय्यर- 12.25 कोटी (कोलकाता)

Advertisement

निकाेलस पुरन- 10.75 कोटी (हैदराबाद)
हर्षल पटेल -10.75 कोटी (बंगळुरु)
वानिंडू हसरंगा – 10.75 कोटी (बंगळुरु)
शार्दुल ठाकूर – 10.75 कोटी (दिल्ली)
प्रसिद्ध कृष्णा – 10 कोटी (राजस्थान)
लाॅकी फर्ग्युसन- 10 कोटी (गुजरात)

कागिसो रबाडा- 9.25 कोटी (पंजाब)
शाहरुख खान – 9 कोटी (पंजाब)
वाॅशिंग्टन सुंदर- 8.75 कोटी (हैदराबाद)
जेसन होल्डर- 8.75 कोटी (लखनऊ)
राहुल त्रिपाठी – 8.75 कोटी (हैदराबाद)

Advertisement

शिखर धवन- 8.25 कोटी (पंजाब किंग्स)
कृणाल पांड्या – 8.25 कोटी (लखनऊ)
शेमरुन हेटमायर -8.25 कोटी (राजस्थान)
ट्रेण्ट बोल्ट- 8 कोटी (राजस्थान)
नितिश राणा – 8 कोटी (केकेआर)

देवदत्त पड्डिकल – 7.75 कोटी (राजस्थान)
जोश हेजलवूड- 7.75 कोटी (बंगळुरु)
मार्क वूड- 7.5 कोटी (लखनऊ)
पॅट कमिंन्स- 7.25 कोटी (कोलकाता)
फाफ डू प्लेसीस- 7 कोटी (बंगळुरु)

Advertisement

अंबाती रायडू – 6.75 कोटी (चेन्नई)
क्विंटन डी क्वाॅक – 6.75 कोटी (लखनऊ)
जाॅनी बेअरस्टाॅ- 6.75 कोटी (पंजाब)
यजुवेंद्र चहल – 6.5 कोटी (राजस्थान)

अभिषेक शर्मा – 6.5 कोटी (हैदराबाद)
मिचेल मार्श – 6.50 कोटी (दिल्ली)
मोहम्मद शमी- 6.25 कोटी (गुजरात)
दीपक हुडा- 5.75 कोटी (लखनऊ)

Advertisement

दिनेश कार्तिक – 5.5 कोटी (बंगळुरु)
आर अश्विन- 5 कोटी (राजस्थान)
राहुल चहर – 5.25 कोटी (पंजाब)
मनिष पांडे – 4.6 कोटी (लखनऊ)
ड्वेन ब्राव्हाे- 4.4 कोटी (सीएसके)
भुवनेश्वर कुमार – 4.2 कोटी (हैदराबाद)
टी. नटराजन – 4 कोटी (हैदराबाद)

रियान पराग – 3.8 कोटी (राजस्थान)
डेवाल्ड ब्रेविस – 3 कोटी (मुंबई)
अभिनव सदारंगी – 2.6 कोटी (गुजरात)
जेसन राय – 2 कोटी (गुजरात)
राॅबिन उथप्पा- 2 कोटी (चेन्नई)
मुस्तफिजूर रेहमान – 2 कोटी (दिल्ली)
कुलदीप यादव – 2 कोटी (दिल्ली)

Advertisement

प्रियम गर्ग – 20 लाख (हैदराबाद)
सर्फराज खान – 20 लाख (दिल्ली)
अश्विन हेब्बर – 20 लाख (दिल्ली)

बोली न लागलेले खेळाडू व त्यांची बेस प्राईज
डेव्हिड मिलर – 1 कोटी
सुरेश रैना – 2 कोटी
स्टिव्ह स्मिथ – 2 कोटी
रजत पाटीदार – 20 लाख

Advertisement

उमेश यादव – 2 कोटी
आदिल रशीद – 2 कोटी
मुजीब झादरान – 2 कोटी
इम्रान ताहीर – 2 कोटी
ऍडम झाम्पा – 2 कोटी
अमित मिश्रा – 1.5 कोटी

मथ्यू वेड – 2 कोटी
वृद्धिमान साहा – 1 कोटी
सॅम बिलिंग्स – 2 कोटी
शाकिब अल हसन – 2 कोटी
मोहम्मद नबी- 1 कोटी

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement