SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक : ‘या’ घटनेमुळे ‘आयपीएल ऑक्शन’ थांबवावा लागला.. कोणत्या खेळाडूवर कितीची बोली लागली.?

बंगळुरुमध्ये ‘आयपीएल-2022’च्या (IPL-2022) हंगामासाठी ‘मेगा ऑक्शन’ सुरु आहे. यापूर्वी 2018 मध्ये ‘मेगा ऑक्शन’ झालं होतं. ऑक्शनच्या पहिल्या सत्रात सगळ्याच स्टार खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. त्यात सर्वाधिक महागडा ठरला तो मुंबईकर श्रेयस अय्यर..

कोलकता नाईट रायडर्सने (KKR) तब्बल 12.25 कोटींची बोली लावत श्रेयसला आपल्या ताफ्यात घेतलं.. जबरदस्त फाॅर्मात असलेल्या श्रेयससाठी चांगली बोली लागणार असल्याचा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणे श्रेयसला कोलकाता संघानं आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम देऊन खरेदी केलं.

Advertisement

दरम्यान, ‘आयपीएल’चा सगळ्यात यशस्वी खेळाडू असलेल्या सुरेश रैनाला यंदाच्या लिलावात कोणीही आपल्या संघात घेतले नाही. रैना व त्याच्या चाहत्यांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या मोसमापासून चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) रैना खेळला. ‘सीएसके’वर निलंबनाई कारवाई झाल्यावर तो गुजरात लायन्सकडून खेळला होता.

रैना याच्यासह ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह स्मिथ, आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, बांग्लादेशचा शाकिब हल हसन लिलावात कोणीही बोली लावली नाही.

Advertisement

..अन् लिलाव थांबवावा लागला..!
दरम्यान, ‘आयपीएल’ लिलावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘आयपीएल’चा लिलाव घेणारे ‘ह्यू एडमिडास’ बोली सुरू असतानाच जमिनीवर कोसळले. वानिंदू हसरंगा याच्यावर बोली सुरू असताना एडमिडास यांना चक्कर आली. त्यामुळे लिलाव थांबवण्यात आला. त्यामुळे आता लंच घेण्यात आला आहे. एडमिडास यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

पहिल्या सत्रातील महागडे खेळाडू
श्रेयस अय्यर- 12.25 कोटी (कोलकाता)
शिखर धवन- 8.25 कोटी (पंजाब किंग्स)
आर अश्विन- 5 कोटी (राजस्थान)

Advertisement

ट्रेण्ट बोल्ट- 8 कोटी (राजस्थान)
कागिसो रबाडा- 9.25 कोटी (पंजाब)
पॅट कमिंन्स- 7.25 कोटी (कोलकाता)
मोहम्मद शमी- 6.25 कोटी (गुजरात)
फाफ डू प्लेसीस- 7 कोटी (बंगळुरु)

ड्वेन ब्राव्हाे- 4.4 कोटी (सीएसके)
नितिश राणा – 8 कोटी (केकेआर)
जेसन होल्डर- 8.75 कोटी (लखनऊ)
हर्षल पटेल -10.75 कोटी (बंगळुरु)
दीपक हुडा- 5.75 कोटी (लखनऊ)
वानिंडू हसरंगा – 10.75 कोटी (बंगळुरु)

Advertisement

देवदत्त पड्डिकल – 7.75 कोटी (राजस्थान)
जेसन राय – 2 कोटी (गुजरात)
शेमरुन हेटमायर -8.25 कोटी (राजस्थान)
मनिष पांडे – 4.6 कोटी (लखनऊ)

Advertisement