समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांचं नाव माहीत नाही असे राज्यात फार कमी लोक आहेत. नवनवीन घटनांद्वारे म्हणा किंवा त्यांच्या विनोदाच्या प्रकारांमुळे किंवा इतर मुद्यांमुळे ते काही वर्षांपासून अनेकदा ते चर्चेत राहतात. असंच काल शुक्रवारी काहीतरी घडलं आणि इंदुरीकर महाराजांनी (indurikar maharaj news) थेट पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठलं. कारणही तसंच होतं, ते जाणून घेऊ..
काय आहे प्रकरण..?
इंदुरीकर महाराजांनी नगर येथील पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठून एक मागणी केली आहे. त्यांनी एक तक्रार केलीय आणि ते म्हणाले, “माझ्या परवानगीशिवाय किर्तनाच्या सीडी राज्यात बऱ्याच ठिकाणी प्रसारित होत असून, या प्रकरणाची होईल तितक्या लवकर चौकशी करावी, अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. असा आरोप त्यांनी अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केल्याचं समजतंय.
दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, समाजात आपल्या किर्तनाद्वारे, वेगळ्या शैलीद्वारे घराघरांत पोहोचणारे व प्रसिद्ध होणारे हे इंदुरीकर महाराज आहेत. राज्यात त्यांच्या किर्तनाच्या सीडी बनवण्याबाबत एका कंपनीला त्यांनी अधिकार दिले आहेत. परंतु ती संबंधित कंपनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे”, अशी खुद्द त्यांनी स्वतःच तक्रार केली असल्याची माहीती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. आता अधिक माहीतीसाठी यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.
ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी तक्रारीचा अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाविषयी माध्यमांशी बोलण्याचे टाळले असले तरी याविषयी आता चांगलीच चर्चा सुरू झालीय. इंदुरीकर महाराज हे शुक्रवारी अचानक पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. याबाबत त्यांनी अतिशय गुप्तता पाळली. कोणालाही याची भनकही नव्हती आणि विनाकारण चर्चेचा मुद्दाही बनायला नको, यासाठी काळजीही घेतली जात होती. तसेच अद्याप ‘त्या’ कंपनीचं नावही अजून गुलदस्त्यात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा
Advertisement