SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

होंडा अ‍ॅक्टिवा की हिरो प्लेजर..? स्टाइल, मायलेज नि किंमतीबाबत जाणून घ्या..!

कोरोना संकटातून आता हा ऑटोमाेबाईल व्यवसाय बऱ्यापैकी सावरला आहे. देशात पेट्रोल-डिझेलची सातत्याने दरवाढ होत असतानाही, स्कूटरची मागणी कमी झालेली नाही. इलेक्ट्रिक स्कूटरकडे ग्राहकांचा कल वाढत असला, तरी पेट्रोलवरील स्कूटरलाही मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते..

कधी काळी हातात हात घालून व्यवसाय करणाऱ्या ‘हिरो’ नि ‘होंडा’ या कंपन्यांचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत.. प्रतिस्पर्धी म्हणून या दोन्ही कंपन्या आता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत.. स्टायलिश माॅडेलसह चांगले मायलेज देणाऱ्या या दोन्ही कंपन्यांच्या स्कूटरला बाजारात मोठी मागणी आहे.

Advertisement

त्यात ‘होंडा अॅक्टिवा 6G’ (Honda Activa 6G) आणि ‘हिरो प्लेझर प्लस एक्सटेक’ (Hero Pleasure Plus Xtec) या स्कूटरची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील.. 100 सीसी सेगमेंटमधील या दोन्ही पैकी कोणती स्कूटर घ्यावी, असा प्रश्न पडला असेल, तर आज आपण या दोन्ही लोकप्रिय स्कूटरबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

होंडा अ‍ॅक्टिव्हा 6G
होंडा कंपनीची ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. या कंपनीने दोन प्रकारांसह स्कूटर बाजारात लॉन्च केली आहे. त्याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement
  • स्कूटरमध्ये 109.51 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे 7.79 पीएस पॉवर आणि 8.79 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.
  • स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. तसेच, ‘अलॉय व्हील’ आणि ‘ट्यूबलेस टायर’ बसवले आहेत.
  • अ‍ॅक्टिव्हा 60 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे मायलेज ‘एआरएआय’ (ARAI) ने प्रमाणित केले आहे.
  • किंमत – 70,599 रुपये (एक्स-शो रूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरियंटवर 72,345 रुपयांपर्यंत जाते.

हीरो प्लेजर प्लस
हिरो कंपनीची ही एक आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर आहे. कंपनीने नुकतीच ‘एक्सटेक’ (Xtec) अवतारात ही स्कूटर सादर केली. त्यात कंपनीने या स्कूटरचे चार प्रकार बाजारात आणले आहेत.

  • हिरो कंपनीने 110.9 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे, जे जास्तीत जास्त 8.1 पीएस पॉवर आणि 8.7 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
  • स्कूटरच्या पुढील नि मागील चाकांमध्ये ड्रम ब्रेक बसवले आहेत. अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर दिले आहेत.
  • हिरो प्लेजर प्लस लिटरला 63 किमी मायलेज देते. हे मायलेज ‘एआरएआय’ने प्रमाणित केले आहे.
  • किंमत – 62,220 रुपये (एक्स-शो रूम, दिल्ली) आहे, टॉप व्हेरियंटवर 71,420 रुपयांपर्यंत जाते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्स ॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement