SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदान करताना ज्यांना बोटे नसतात, त्यांना कुठे लावली जाते शाई? जाणून घ्या..

देशात लोकशाहीत मतदान हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे. तुमचं नाव जर मतदार यादीत असेल तर तुम्ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व इतर काही निवडणूकीसाठी तुम्ही मतदान करू शकता. आपण मतदान करायला जाताना एका विशिष्ट प्रक्रियेतून जावं लागतं. मतदाराला आपलं ओळखपत्र दाखवावं लागतं आणि मतदाराच्या हाताच्या बोटावर शाईची खूण केली जाते, जेणेकरून मतदाराने मतदान केलं आहे, असं आपल्याला समजतं.

आता असे कित्येक उमेदवार आहेत की जे अपंग आहेत, ज्यांना मतदान करण्यासाठी येणे-जाणे करणे मुश्किल होते. मग काहींना हाताची समस्या तर काहींना पायाची, कोणी व्हीलचेअरवर येतात तर कोणी कुटुंबातील व्यक्तींना मतदानासाठी सोबत घेऊन येतात. तुम्हाला तर माहीतच असेल की, तुमचा मतदानाचा अधिकार हा एक लोकशाहीने दिलेला मजबूत अधिकार आहे, कारण एका मतानं एखादा उमेदवार पडतो किंवा जिंकतो. उमेदवाराला याचं महत्व चांगलंच समजतं. त्यामुळे प्रत्येक मत मौल्यवान आहे आणि भविष्यात चांगली कामे करणारा उमेदवार निवडण्यावर आपला जोर असतो. यामुळेच कोणी उमेदवार कामाने तर कोणी आवश्वासने देऊनही निवडून येतात.

Advertisement

तुम्ही मतदान केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की, मतदान करण्यापूर्वी मतदान कशात प्रवेश केल्यानंतर तुमच्या बोटाला शाई लावली जाते. त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला जातो. मग मतदान कक्षातून बाहेर आल्यावर ती शाई सुकून जाते. यामुळे मतदान केलं की नाही याबाबत कळतं. तसेच बोगस मतदान टाळलं जातं. कारण ती शाई बोटाने पुसून किंवा साबणाने धुवून जात नाही, म्हणून तुम्ही त्याच दिवशी पुन्हा मतदान करू शकत नाही. ती शाई निघून जाण्याकरता काही दिवस लागतात.

बोटं नसलेल्या मतदाराला शाई कुठे लावली जाते?

Advertisement

तुम्ही कधी विचार केलाय का, निवडणुकीला जे लोकं मतदान करतात, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाची काही नियमावली आहे. मतदार व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर मतदानाचा हक्क बजावताना शाई लावली जाते. ब्रशने नखाच्या वर पहिल्या गाठीपर्यंत शाई लावली जाते. याचे फक्त एक कारण आहे की, त्या संबंधित व्यक्तीने मत दिलं आहे आणि बोगस मतदानाला आळा बसावा.

आता एखाद्या व्यक्तीने ही शाई पुसण्याचा किंवा धुवायचा प्रयत्न केला तर ती ना पुसली जाते ना धुतली जाते. म्हणून शाई कित्येक दिवस बोटावरून निघत नाही. काही वेळी समजा जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हाताची तर्जनी नसेल, तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनी शिवाय इतर बोटांपैकी एका बोटाला शाई लावली जाते. मग मतदानाचा हक्क बजावताना त्यांना उजव्या हाताला बोटंच नसतील तर डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. काही परिस्थितीत मात्र दोन्ही हातांमध्ये बोटं नसल्यास दोन्ही हातांच्या कोणत्याही भागावर निवडणुकीची शाई लावता येते. त्याच वेळी, व्यक्तीला दोन्ही हात नसल्यास, पायाच्या बोटावर निवडणुकीची शाई लावली जाते. अशा रीतीने मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात.
➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉 https://jio.sh/spreadit

Advertisement